टीव्हीएसने आपली बजेट बाइक टीव्हीएस रेडियनला (TVS Radeon) खास फीचर्ससह एका नवीन अवतारात आणण्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. एका रिपोर्टनुसार, टीव्हीएस रेडियनचे हे मॉडेल स्मार्ट फीचरसह ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे ही बाइक अधिकच स्मार्ट होणार आहे. ग्राहकांना यात डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, स्मार्ट नेव्हिगेशन, एलईडी डीआरएल आणि एलईडी हेडलाइट सारखे स्मार्ट फीचर्स मिळणार आहेत. रेडियन बाइकची स्पर्धा हिरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) स्प्लेंडरशी होत आहे. स्प्लेंडर प्लस (Splendor plus) बाइकने Xtec एडिशनअंतर्गत अनेक स्मार्ट फीचर्ससह दाखल झाली होती. स्प्लेंडरच्या या नवीन मॉडेलशी स्पर्धा करण्यासाठी टीव्हीएस रेडियन बाइकच्या स्मार्ट मॉडेलला बाजारात उतरविण्यात आले आहे.
नुकतेच हिरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर प्लसची Xtec एडिशन लाँच केली आहे. कंपनीने स्प्लेंडर प्लसचे नवीन मॉडेल एक फुल डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, Xtec कनेक्टिव्हिटी सूट आणि एलईडी डीआरएल सारखे अनेक स्मार्ट फीचर्सह सादर केले आहे. टीव्हीएस, हिरो मोटोकॉर्पच्या मॉडेलला टक्कर देण्यासाठी टीव्हीएसने रेडियनचे नवीन मॉडेल बाजारात उतरविले आहे.
टीव्हीएस रेडियनच्या नवीन मॉडेलमध्ये कंपनी टीव्हीएस रायडरचे फीचर्स देण्याची शक्यता आहे. टीव्हीएस रायडर मॉडेल रेडियनच्या खूप जवळपास दिसून येत आहे. टीव्हीएस रायडरच्या डिजिटल स्पीडोमीटर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, स्मार्ट नेव्हिगेशन, एलइडी डीआरएल आणि एलईडी हेडलाइट सारखे स्मार्ट फीचर्स रेडियनच्या नवीन मॉडेलमध्येही आल्याने रेडियन, स्प्लेंडरच्या तुलनेत अधिक चांगले मॉडेल ठरु शकते.
स्प्लेंडरच्या Xtec एडिशनशी स्पर्धा करताना टीव्हीएस रेडियनचे स्मार्ट मॉडेल रियल टाइम फ्यूअल एफिशिएंसी, साइड स्टेंड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाइंडर, टँक रेंज, लो फ्यूअल इंडिकेटर सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, टीव्हीएस रेडियनमध्ये युजर्सला फ्रंट डिस्क ब्रेक पर्याय मिळत असून ते स्पर्धेच्या दृष्टीने स्प्लेंडला वरचढ ठरत आहेत.
टीव्हीएस रेडियनमध्ये ग्राहकांना 109.7 सीसीचे इंजिन मिळणार आहेत. हिरो मोटोकार्पच्या स्प्लेंडर प्लसमध्ये 97.2 सीसी इंजिन मिळत आहे. दोन्ही बाइक 60 kmpl चा मायलेज देण्याची क्षमता ठेवतात. टीव्हीएस रेडियनचे 2022 व्हेरिएंट सणासुदींच्या दिवसांमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.