मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : भारतात कारचे मार्केट खूप मोठे आहे. अनेकदा आपल्याला अनेक आकाराच्या आणि विविध प्रकाराच्या कार डीझाईन आणि मॉडेलमुळे गोंधळ उडतो. अनेकदा तर ओला-उबरच्या मोबाईल एपवर कार बुक करताना आपण प्रवासी संख्येच्यानूसार कोणत्या आकाराची गाडी बुक करायची या कन्फ्यूजनमध्ये सापडतो. तर आता आपण पाहून आकारच्या आणि डीझाईनवरुन त्या मॉडेलला काय म्हणतात हे पाहूयात..
ही कार छोट्या आकाराची असते. जिच्या पाठीमागे वर उघडणारा दरवाजा असतो. म्हणजे आपण अधिक सामान तिच्या पाठीमागे ठेवू शकतो. याशिवाय या कारला चार दरवाजे असतात. बाजारात दोन दरवाज्याच्या हॅचबॅक कारही आहेत. मारुती सुझुकी ऑल्टो, हुंडई आय 10, टाटा टियागो, मारुती स्विफ्ट, बलेनो आणि वॅगन आर सारख्या कार हॅचबॅक कार म्हणून ओळखल्या जातात.
या कारना बूट स्पेस ( डीक्की ) वरुन ओळखता येते. ही कारची डीक्की हॅचबॅक सारखी आतून उघडी नसते. सेपरेट असते. त्यामुळे या डीक्कीचा वापर बाहेरील बाजूने करता येतो. तर नॉचबॅक कारमध्ये बूट स्पेस हॅचबॅक सारखा छोटा असतो. सेडान कार तीन भागात असते, इंजीन, केबिन आणि बूट स्पेस. सेडान हा शब्द अमेरिकन इंग्रजी शब्द आहे. ब्रिटनच्या इंग्रजीत त्याला सलून म्हटले जाते. होंडा सिटी, मारुती सियाज, स्कोडा रेपिड, स्कोडा ऑक्टोविया, टोयोटा कोरोला ही काही सेडानची कारची उदाहरणे आहेत.
एसयूव्ही ही प्रवासी आणि ऑफ-रोड कारचे एकत्र रुप आहे. या कारची शहरांबाहेरील ओबडधोबड रस्त्यांवर धावण्याची क्षमता असते. या कारचा मोठा आकार आणि चाकेही मोठी असतात . मात्र, सध्या त्यांचा वापर शहरांमध्येच जास्त होताना दिसत आहे. या वाहनांमध्ये टोयोटा फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर, जीप कंपास, रेंज रोव्हर, एमजी हेक्टर, महिंद्रा अल्तुरास, टाटा सफारी बीएमडब्ल्यू X5 आणि मर्सिडीज बेंझ जीएलसी या वाहनांचा समावेश आहे.
एसयूव्ही कारचे अनेक प्रकार आहेत. परंतु कॉम्पॅक्ट एसयूव्हीला जास्त मागणी आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही एसयूव्हीची लहान आवृत्ती आहे. जी 4 पेक्षा कमी आहे, परंतु डिझाइन आणि कार्य SUV प्रमाणेच आहे. मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV300 आणि फोर्ड इको स्पोर्ट्स या SUV ना देशात सर्वाधिक मागणी आहे.
या कार सेडान कारचे छोट्या आवृत्त्या म्हटल्या तरी वावगे ठरणार नाही. यांचा आकार चार मीटरपेक्षा कमी असतो. बाकी इतरबाबी सेडान कार सारख्या असतात. आकार कमी असल्याने हीला कमी कर द्यावा लागतो. त्यामुळे कंपन्यांना अधिक फायदा होतो. मारुती सुझुकी डीझायर, होंडा अमेज, टाटा टिगोर आणि हुंडई एक्सेंट या कॉम्पॅक्ट सेडान कार आहेत.
या कारमध्ये पेट्रोल किंवा डीझेल इंजिन सोबत लेटेस्ट इलेक्ट्रीक मोटरचा देखील प्रयोग केला जातो. त्यामुळे पारंपारिक इंधनाची बचत होऊन जादा मायलेज मिळते. गरज असेल तेव्हा या कार पेट्रोल वा डीझेलवर देखील चालू शकतात. पर्यावरण स्नेही कारमध्ये टोयोटा ग्लेजा, टोयोटा कॅमरी, होंडा अकॉर्ड लेक्सस आरएस, वॉल्वो एक्ससी 90कारचा समावेश होतो.
याशिवाय विनाछताची स्पोर्टी लूकवाली कुपे कार ज्यात फोर्ड मस्टंग, ऑडी आर8 आणि मर्सिडीझ बेंझ जीएलए कारचा समावेश आहे. तसेच मायक्रो कार ज्यात टाटाच्या नॅनो सारख्या कारचा समावेश होतो, तसे एसयूव्ही आणि हॅचबॅक कॉम्बिनेशन असणाऱ्या क्रॉसओव्हर हॅचबॅक कारही असतात त्यात टाटा टियागो एनआरजी, वॉल्वो वी 40 क्रॉस कंट्री, फोर्ड फ्रीस्टाइल, हुंडई आई 20 एक्टीव, फॉक्सवॅगन पोलो एडवेंचर कार आदीचा समावेश होतो.