नव्या इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह Maruti Suzuki Swift चं अपडेटेड वर्जन लवकरच बाजारात

| Updated on: Feb 14, 2021 | 4:13 PM

Maruti Suzuki कंपनी भारतीय बाजारात लवकरच नवीन स्विफ्ट (Swift) लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.

नव्या इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह Maruti Suzuki Swift चं अपडेटेड वर्जन लवकरच बाजारात
Follow us on

मुंबई : Maruti Suzuki कंपनी भारतीय बाजारात लवकरच नवीन स्विफ्ट (Swift) लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. Swift सध्या तिच्या तिसऱ्या जनरेशनमध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये कंपनीने या कारमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल केले आहेत, त्याशिवाय कोणतेही मोठे बदल कंपनीने या कारमध्ये केलेले नाहीत. दरम्यान कंपनीने गेल्या वर्षी एक नवीन स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेन्मेंट सिस्टिम सादर केली होती. ही सिस्टिम नव्या Swift मध्येदेखील पाहायला मिळणार आहे. (Updated Maruti Suzuki Swift to be launched soon; Vxi variant gets new infotainment system)

गेल्या वर्षी कंपनीने त्यांची अपडेटेड स्विफ्ट सादर केली होती. तेव्हापासून ही कार कंपनी कधी लाँच करणार असा प्रश्न ग्राहकांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर ही कार या वर्षी लाँच केली जाऊ शकते. दरम्यान या कारचं जुनं वर्जन अजून काही महिने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच आगामी काळात जुन्या वर्जनवर कंपनी मोठ्या डिस्काऊंट ऑफर सादर करु शकते.

नवे फीचर्स

नव्या स्विफ्टमध्ये अपडेटेड फेस, नवे अलॉयसह एक रिफ्रेश केबिनही असेल. तसेच कंपनीने एक नवं फीचरही सादर केलं आहे. Vxi मिड-स्पेक ट्रिमसाठी नवी इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. पूर्वी केवळ ब्लूटूथ आणि ऑक्स कनेक्टिविटीसह एक एकल-डीआयएन ऑडियो प्लेयर सादर करण्यात आला होता. यासह कंपनी एक टच इन्फोटेन्मेंट सिस्टिमही देणार आहे.

मारुतीने नवीन इन्फोटेन्मेंट युनिटसह दोन्ही डिजायर आणि अर्टिगा ही कारही अपडेट केली आहे. ही सिस्टिम नव्या स्विफ्टमध्येदेखील दिली जाईल. स्विफ्टमध्ये तुम्हाला स्क्रीन साईज थोडी लहान मिळेल. त्यामुळे तुम्ही या कारमध्ये व्हिडीओ प्ले करु शकणार नाही, परंतु टच पॅनल जुन्या होंडा Jazz प्रमाणे असेल. या कारचं स्टीयरिंग व्हील एक फ्लॅट-बॉटम युनिट असेल.

मारुती सुझुकी या कारमध्ये 1.2-लीटर ड्यूलजेट मोटर जोडणार आहे, म्हणजेच अधिक पॉवर जनरेट होईल. या कारचं इंजिन 88hp सह येईल तर टॉर्क जुन्या वर्जनप्रमाणेच असेल, म्हणजेच 113Nm पीक टॉर्क जनरेट होईल. फ्यूल मायलेजबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 24kmpl हून अधिक मायलेज मिळेल. दरम्यान कारमधील नव्या बदलांनंतर या कारची किंमत 15,000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या स्विफ्टची एक्स शोरुम किंमत 5.49 लाख रुपये इतकी आहे.

उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

नवं डिझाईन, अधिक स्पेस, Mahindra ची स्वस्त Scorpio लवकरच बाजारात

Maruti Suzuki च्या उत्पादनात घट, प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये मोठं नुकसान

(Updated Maruti Suzuki Swift to be launched soon; Vxi variant gets new infotainment system)