ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?

| Updated on: May 11, 2021 | 4:57 PM

हल्लीच्या हायटेक वाहनांमध्ये आपण पाहात असलेली सर्व नवीन वैशिष्ट्ये (फीचर्स) एका लहान चिपच्या (Semiconductor Chip) मदतीने काम करतात.

ऑटोमोबाईल कंपन्यांचा कर्दनकाळ ठरलेलं ग्लोबल चिप शॉर्टेज प्रकरण नक्की आहे तरी काय?
Global Chip Shortage
Follow us on

मुंबई : हल्लीच्या हायटेक वाहनांमध्ये आपण पाहात असलेली सर्व नवीन वैशिष्ट्ये (फीचर्स) एका लहान चिपच्या मदतीने काम करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच, जर आपल्या कारमध्ये सेमीकंडक्टर चिप (Semiconductor Chip) नसेल तर तुमची कार व्यवस्थित चालणार नाही, अगदी लॅपटॉप, फोन आणि टीव्हीसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूदेखील चालणार नाहीत. सध्या जगात या सेमीकंडक्टर चिपची कमतरता आहे, ज्याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. (What is global Semiconductor chip shortage? and why cars prices increasing and come up with less features)

या जागतिक सेमीकंडक्टर चिप टंचाईमुळे (Global Semiconductor Chip Shortage) नवीन वाहने खूप महाग होत आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेत नवीन वाहने खरेदी करणाऱ्या 13 टक्के ग्राहकांची किंमत ही स्टिकर किंमतीपेक्षा जास्त होती. असं घडलं कारण चिपची कमतरता दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे, वाहन उत्पादक कंपन्यांनी काही काळ त्यांचे उत्पादन थांबवले आहे. कारण या चिपच्या मदतीने वाहनांमध्ये अनेक नवनवे फीचर्स दिले जातात.

सर्वात वाईट बाब एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षी वाहन उद्योगाचं खूप मोठं नुकसान झालं होतं. त्यातून सावरत वाहन उद्योग पुन्हा रुळावर आला आहे, असं वाटू लागलेलं असताना सेमीकंडक्टर चिप टंचाई निर्माण झाल्याने पुन्हा एकदा वाहन उद्योगाला मोठा फटका बसत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. परंतु आता ग्राहकांनी जुन्या वाहनांची खरेदी करण्यास सुरवात केली आहे.

जनरल मोटर्सने असे म्हटले आहे की, मागील वर्षी फुल साइज ट्रकची किंमत कमी होती, परंतु त्यात आता दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एसयूव्हीच्या किंमतीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. फोर्ड आणि फोक्सवॅगन कंपन्या म्हणतात की, आगामी काळात यापेक्षा वाईट परिस्थिती उद्भवणार आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांचे उत्पादन निम्मे झाले आहे. उत्पादन पुढील काळात अजून काही प्रमाणात कमी होऊ शकतं.

सेमीकंडक्टर चिप टंचाई कशामुळे?

संपूर्ण जगात कोरोना साथीच्या आजारामुळे प्रत्येक कारखाना आणि व्यवसायांना टाळं लागलं आहे. अशा परिस्थितीत कार उत्पादक कंपन्यांनी कार बनविणे बंद केले आहे, दुसरीकडे सेमीकंडक्टर उद्योग बंद झाल्यामुळे आता चिपचे उत्पादनही फारसे होत नाही. अशा परिस्थितीत कोव्हिड-19 मुळे जगभरातील फ्लाइट्सच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. म्हणजे आधीच उत्पादनात कमतरता निर्माण झालेली असताना त्यातच आता चिप्सच्या आयात-निर्यातीवरही परिणाम झाला आहे. या सर्व कारणांमुळे, आज संपूर्ण इलेक्ट्रॉनिक बाजार, ऑटोमोबाईल बाजार सेमीकंडक्टर चिप्सच्या टंचाईचा सामना करत आहे.

इतर बातम्या

Hero MotoCorp 16 मेपर्यंत दुचाकींची निर्मिती करणार नाही, जाणून घ्या कारण

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

भारतीयांच्या पसंतीस उतरलेली Mahindra ची SUV नव्या अवतारात लाँच होणार

(What is global Semiconductor chip shortage? and why cars prices increasing and come up with less features)