नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : अनेक जणांना बाईकवरचा प्रवास आवडतो. काही जण खडतर रस्त्यावरुन बाईकचा थ्रील अनुभवतात. अनेकांना दुचाकीवर लांब प्रवास आवडतो. सहाजिकच त्यासाठी बाईक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. बाईकची कंडिशन चांगली असावी. बाईक हे पण एक यंत्रच आहे. त्यात पण बिघाड होऊ शकतो. अनेकदा दुरच्या प्रवासात बाईक काम दाखवते. नेमका त्यात बिघाड होतो. बाईकवरुन जात असताना क्लच वायर अथवा ब्रेक केबल तुटल्यावर अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा बाईक वेगात असेल तर अपघाताचा धोका असतो. बाईकचे क्लच, ब्रेक वायर तुटल्यास बाईक लोटत न नेता, हा उपया करुन पाहा.
गॅरेजचा रस्ता शोधा
बाईकचे क्लच वायर अथवा ब्रेक केबल तुटले तर मॅकेनिककडे जावे लागते. त्यासाठी पायी बाईक घेऊन फिरावे लागते. विचारपूस करत बाईक लोटत न्यावी लागते. क्लच वायर तुटल्यावर तुम्हाला पायी बाईक लोटण्याची गरज नाही. तुम्ही बाईक दामटवू शकता, पण त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
क्लच वायर तुटल्यावर करा हे काम
बाईक चालविताना अचानक क्लच वायर तुटले तर चिंता करण्याची गरज नाही. विना क्लच बाईक चलाविल्या जाऊ शकते. सर्वात अगोदर तुम्हाला मानसिकरित्या स्वतःला तयार करावे लागेल. सर्वात अगोदर बाईक न्यूट्रल करा. बाईकला स्टँडवर लावा. न्युट्रलवरच बाईक सुरु करा आणि पहिला गिअर टाका. क्लच नसल्याने बाईक समोरील बाजूला झुकेल.
आता बाईकला सावकाश एक्सलेरेशन द्या. वेग वाढवू नका. दुसरा गिअर टाका, गिअर टाकताना अडचण येईल. कारण क्लच नसेल. तो अडकू पण शकतो. पण वेग वाढवू नका. आता या दुसऱ्या गिअरवरच तुम्हाला दुचाकी चालवायची आहे. बाईकचा वेग 30-35 किमी/प्रति तास असा ठेवा. कमी रहदारी असलेल्या रस्त्यावरुन वाहन चालवा.
ब्रेक केबल तुटले तर अशी चालवा बाईक
ब्रेक केबल तुटल्यावर घाबरु नका. अशा परिस्थितीत शांत राहा. हँडल ब्रेक तुटले असेल तर पॅडल ब्रेकचा वापर करा. हे काम सावधपणे करा. कमी गिअरवर आणि कमी वेगात बाईक चालवा. लवकर मॅकेनिकपर्यंत पोहचा. जास्त लांबचे अंतर एकदम कापू नका.
(सूचना – ही केवळ माहिती आहे. बाईकचे क्लच वायर अथवा ब्रेक केबल तुटले तर घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. जर गॅरेज जवळ असेल तर दुचाकी लोटत ना. दूर असेल तर सावधगिरी बाळगा. बाईकची वेळेवर सर्व्हिसिंग करा.)