Three Point Seat Belt : अब्जावधींचे प्राण वाचविणाऱ्या थ्री पॉईंट सिटबेल्टचे जनक कोण ? माहीतीय का ?

| Updated on: Jul 10, 2023 | 12:33 PM

त्यांनी चालक जखमी होऊ नये यासाठी छातीला संरक्षण म्हणून हा साधा थ्री पॉईंट बेल्ट बसविण्याचा पर्याय आणला. परंतू तोच पुढे जगभरातील अब्जावधी कार चालकांचे प्राण वाचविणारा ठरेल हे त्यांनाही स्वप्नात वाटले नसेल.

Three Point Seat Belt :  अब्जावधींचे प्राण वाचविणाऱ्या थ्री पॉईंट सिटबेल्टचे जनक कोण ? माहीतीय का ?
The-History-of-Seatbelts
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध शापूरजी पालनजी ग्रुप परिवाराचे सदस्य आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्री यांचा गेल्यावर्षी 5 सप्टेंबर रोजी पालघर येथे भरधाव कार डीव्हायडरला धडकल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर कारच्या सिटबेल्टचा विषय खूपच चर्चेला आला होता. कारण कोट्यवधी रुपयांच्या मर्सिडीझ बेन्झ या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारमध्ये त्यांनी पाटच्या आसनावर बसताना सिटबेल्टवर न लावल्याने तसेच कारच्या साईड एअर बलुनचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आतापर्यंत अब्जावधी कारचालकांना वाचविणाऱ्या थ्री पॉईंट सिटबेल्टचा निर्माता कोण आहे असा सवाल तुम्हाला निर्माण झाला असेल तर पाहा कोण आहे तो…?

आपण कारमधून एखादा ट्रॅफिक हवालदार दिसतात नाईलजाने किंवा नाराजी सिटबेल्ट खांद्यावर नाखुशीने चढवतो. परंतू, आता कार ड्रायव्हरने लेन बदलल्यास, तसेच ड्रायव्हरला सतत जागे ठेवणारे रडार नियंत्रित ऑटोमेटिक बार्कींगची वार्निंग सिस्टीम आली आहे. तरीही अद्याप थ्री पॉईंट सिटबेल्टचे महत्व काही घटले नाही. आजही सिटबेल्ट लाखो- कोट्यवधी चालकांचे प्राण वाचवित आहे. या थ्री पॉईंट सिटबेल्टचा पालकत्व एका कंपनीच्या इंजिनियरकडे जाते कोण आहे तो ?

Swedish inventor Nils Bohlin for Volvo

Swedish inventor Nils Bohlin for Volvo

 

व्होल्वो कार कंपनीत इंजिनिअर

युके स्थित ऑटो वेबसाईटचे अरनोल्ड कार्ल्क यांनी दिलेल्या माहीतीनूसार व्होल्वो कार कंपनीत इंजिनिअर असलेल्या नील्स बोह्ललीन यांनी साल 1952 मध्ये चालक जखमी होऊ नये यासाठी छातीला संरक्षण म्हणून हा साधा थ्री पॉईंट बेल्ट बसविण्याचा पर्याय आणला. परंतू तोच पुढे जगभरातील लाखो कार चालकांचे प्राण वाचविणारा ठरेल हे त्यांनाही स्वप्नात वाटले नसेल.

म्हणून पेटेंट काढले नाही

1959 नंतर प्रत्येक नव्या व्होल्वो कारसोबत तो पुरविण्यात आला. याचे पेटेंटही काढण्यात येणार होते. मात्र सर्वांचे प्राण वाचविणारी इतक्या साध्या गोष्टीचे पेटंट कशाला म्हणून नील्स यांनी पेटंट घेतले नाही. त्यानंतर कारच्या सेफ्टीसाठी नील्स साईड इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि रेअर सिट बेल्टसाठी साल 1985 पर्यंत मागणी करीत राहीले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना थ्री पॉईंट सिट बेल्टकरीता रॉयल स्वीडीश एकेडमी ऑफ इंजिनिअरिंग सायन्सतर्फे सुवर्ण पदक देण्यात आले.

दहा ते पंधरा वर्षांनी बदलावा 

साल 2002 मध्ये नील्स यांचा मृत्यू झाला. आज कारमध्ये एअर बॅग्सचा शोध लागला आहे. ड्रायव्हरला जागे करणारे सीसीटीव्ही तंत्रज्ञान आले आहे. अब्जावधी लोकांचा प्राण वाचविणारा हा थ्री पॉइंट सिट बेल्ट सर्वच कंपन्यांनी चालकांसाठी सुरक्षेसाठी स्वीकारला. सिटबेल्टच्या आयुष्यावरुन तो किती जुना झाला तर किती संरक्षण देईल हे ठरविणे कठीण असले तरी दर दहा ते पंधरा वर्षांनी त्याची स्थिती पाहून तो बदलण्यात यावा असेही सूत्रांनी सांगितले.