Hyundai Controversy: काश्मीर मुद्द्यावरुन ह्युंडईची माफी, तरीही Twitter वर #BoycottHyundai ट्रेंड का?

| Updated on: Feb 08, 2022 | 1:10 PM

काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान ह्युंडईच्या (Pakistan Hyundai) आक्षेपार्ह पोस्टबद्दल भारतीयांचा संताप अजूनही कायम आहे. सोशल मीडयावरील लोकांच्या संतापानंतर ह्युंडई इंडियाकडून अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले आहे. पण, असे असतानाही भारतीय युजर्सचा संताप कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे.

Hyundai Controversy: काश्मीर मुद्द्यावरुन ह्युंडईची माफी, तरीही Twitter वर #BoycottHyundai ट्रेंड का?
Pakistan Hyundai
Follow us on

ह्युंडई काश्मीर कॉन्ट्रोव्हर्सी (Hyundai Kashmir Controversy) : काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान ह्युंडईच्या (Pakistan Hyundai) आक्षेपार्ह पोस्टबद्दल भारतीयांचा संताप अजूनही कायम आहे. सोशल मीडयावरील लोकांच्या संतापानंतर ह्युंडई इंडियाकडून अधिकृत निवेदनही जारी करण्यात आले आहे. पण, असे असतानाही भारतीय युजर्सचा संताप कमी होण्याऐवजी आणखी वाढला आहे. यामुळेच बॉयकॉट ह्युंडई (#BoycottHyundai) हा हॅशटॅक ट्विटरवर ट्रेंड करत आहे. पाकिस्तान ह्युंडईने काश्मीर मुद्यावरुन सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे भारतीय युजर्स ह्युंडई कंपनीवर संतप्त आहेत. दक्षिण कोरियन कंपनीच्या पाकिस्तान युनिटने अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. पाकिस्तान ह्युंडईने (Pakistan Hyundai) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले होते की, “आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि त्यांनी सुरु केलेला स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवत त्यांच्या समर्थनार्थ उभे राहूया.”

ह्युंडई कंपनी एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी फेसबुकवर वादग्रस्त पोस्टही शेअर केली होती. ज्यावर भारतीय आणि भारतीय वंशाच्या लोकानी तीव्र निषेध व्यक्त केला. वाढता दबाव पाहून पाकिस्तान ह्युंडईने आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवरून या पोस्ट हटवल्या आहेत. मात्र तोवर खूप उशीर झाला होता.

Hyundai India चं स्पष्टीकरण

काश्मीर मुद्द्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून भारतात त्याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरु झाला. यादरम्यान, Hyundai India ने आपल्या ट्विटर अकाउंटवर अधिकृत निवेदन जारी केले आहे. कंपनीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, कंपनी गेल्या 25 वर्षांपासून भारतात व्यवसाय करत आहे आणि राष्ट्रवादाच्या भावनेचा मनापासून आदर करते. कंपनीने निवेदनात पुढे म्हटले आहे की Hyundai ब्रँडसाठी भारत हे दुसरे घर आहे आणि आमच्याकडे कोणत्याही संवेदनशील संवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स धोरण आहे. या देशाच्या आणि लोकांच्या भल्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

निवेदनानंतरही भारतीय संतप्त

ह्युंडई इंडियाने काश्मीर प्रश्नावर जारी केलेल्या निवेदनानंतरही भारतीय यूजर्सचा संताप वाढला आहे. लोकांचे म्हणणे आहे की, कंपनीने या मुद्द्यावर माफी मागितलेली नाही, ज्याची सर्वात जास्त गरज आहे.

ट्विटरवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

ह्युंडई इंडियाच्या निवेदनानंतर शशांक शेखर झा नावाच्या युजरने तीन मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये बिनशर्त माफी मागणे, कंपनीने ब्लॉक केलेल्या भारतीय युजर्सना अनब्लॉक करणे आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून स्वीकारणे यांचा समावेश आहे.

पाहा मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्वीट

ह्युंदाईनं दिलेल्या स्पष्टीकरणावरही अनेकजण भडकले आहेत. काहींनी ह्युंदाईन केलेलं पाऊल हे राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच काय तर स्पष्टीकरण देताना त्यांनी माफी मागितली नसल्यानं अनेकांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. भारताला सेकंड होम म्हणणारं ह्युंदाई, भारतालाच नुकसान पोहोचवण्याचा अजेंडा राबवत असल्याचा दावा करत अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

इतर बातम्या

मोठी बॅटरी, 64MP कॅमेरासह Vivo चा किफायतशीर 5G स्मार्टफोन बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

3D अवतार, स्क्रीन शेअरिंगसह भन्नाट फीचर्स, Instagram वापरणं अधिक मजेदार होणार, पाहा नवीन फीचर्सची यादी

Tata Play Fiber कडून एक महिना मोफत 1000GB हाय-स्पीड इंटरनेट, जाणून घ्या ऑफर क्लेम करण्याची पद्धत