उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले, “जय महाराष्ट्र”

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

प्रशांत लीला रामदास, अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किला परिसरात जंगी […]

उत्तर प्रदेशात जाऊन उद्धव ठाकरे म्हणाले, जय महाराष्ट्र
Follow us on

प्रशांत लीला रामदास, अयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील लक्ष्मण किल्यावर जाऊन राम मंदिराचा आग्रह धरला. पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. यापुढे वारंवार येणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. राम मंदिराचा अध्यादेश आणा. नोटाबंदीसारखा राम मंदिराचा कायदा करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किला परिसरात जंगी स्वागत करण्यात आलं.  ढोल ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे दुपारी साडेतीनच्या सुमारास लक्ष्मण किल्ल्यावर दाखल झाले. इथे त्यांनी सहकुटुंब पूजा-अर्चा केली. मात्र सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते त्यांनी सोबत आणलेल्या चांदीच्या वीटेने. तब्बल 4 किलोची चांदीची वीट उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर आणली आहे. ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदीर फीर सरकार’ अशी घोषणा देत शिवसैनिक राम मंदिरासाठी अयोध्येत आले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट तेव्हा झाला, जेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन “जय हिंद, जय महाराष्ट्र” म्हणत आपल्या भाषणाचा समारोप केला. नोटाबंदीचा निर्णय घेतला, तसाच अध्यादेश राम मंदिरासाठी आणा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, वारंवार येत राहणार. अयोध्येत राम मंदिर झालंच पाहिजे. झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला अयोध्येत आलोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आपण मंदिर बनवा मी श्रेय घेणार नाही. फक्त मी रामभक्त म्हणून येणार आहे. आता हिंदू गप्प राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

 

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रापासून ते अयोध्येपर्यंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारल्याचं चित्रं आहे. उद्धव ठाकरे आज अयोध्येला रवाना होणार आहेत. पण, त्याआधीच त्यांनी शिवनेरी किल्ल्यावरुन आपल्या दौऱ्याचं रणशिंग फुंकलंय. अयोध्या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेही आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिरासाठी चांदीची वीट दाण करणार आहेत. श्री राम मंदिराच्या पुजाऱ्यांना राम मंदिराच्या निर्माणासाठी ही चांदीची वीट दान केली जाईल. राम ललाचे दर्शन घेताना 25 नोव्हेंबरला वीट पुजाऱ्यांकडे सोपवली जाईल.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा

अयोध्येत सुरक्षेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. 7 IPS अधिकारी संपूर्ण सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत.  सूत्रांच्या माहितीनुसार 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक, 1 पोलिस उपमहानिरीक्षक, 3 एसएसपी, 10 पोलीस सहाय्यक अधीक्षक, 21 पोलीस उपअधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल,  42 पीएस कंपनी, 5 रॅपिड अॅक्शन फोर्स, एटीएस कमांडो, ड्रोन कॅमेरे हा सर्व लवाजमा अयोध्येत तैनात आहे.

https://www.youtube.com/watch?v=0UzHB9vrqf4