अयोध्या : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी हिंदुत्वावर भाष्य केलंय. “फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली आहे!”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray Ayodhya Daura) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. दिपाली सय्यददेखील अयोध्येत पोहोचल्या आहेत. यावेळी टीव्ही9 शी त्यांनी बातचित केली. तेव्हा शिवसेनेचंच हिंदुत्व (Hindutva) असली आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसंच आपणच दौरा घोषित करायचा स्वत:च तो रद्द करायचा आणि हिंदुत्वाची पताका आपल्याच खांद्यावर असल्याचं भासवायचं, हे योग्य नाही, असं म्हणत त्यांनी मनसेला फटकारलं आहे.
दिपाली सय्यद आज अयोध्येत आहेत. यावेळी त्यांनी हिंदुत्वावर भाष्य केलंय. “फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली आहे!”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
दिपाली सय्यद रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून तसंच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून मनसेला फटकारलं आहे. “आपणच दौरा घोषित करायचा, स्वत:च तो रद्द करायचा आणि हिंदुत्वाची पताका आपल्याच खांद्यावर असल्याचं भासवायचं, हे योग्य नाही”, असं म्हणत त्यांनी मनसेला फटकारलं आहे.
शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवरणमंत्री आदित्य ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, सेनेचे वरिष्ठ नेते चंद्रकांत खैरे, दिपाली सय्यद तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित आहेत.
आदित्य ठाकरे सध्या लखनौमध्ये दाखल झाले आहे. दुपारी 1.30 वाजता ते अयोध्येत जातील. इस्कॉन मंदिराला भेट देतील.
दुपारी 2.30 अयोध्येतील हॉटेल पंचशीलमध्ये ते पोहचतील. दुपारी 3.30 ते याच हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली. 4:30 वाजता ते हनुमान गढीवर दर्शनासाठी जातील. संध्याकाळी 5.00 वाजता रामलल्लाचं दर्शन घेतील. 6:00 वाजता लक्ष्मण किल्ल्यावर जाती. सात वाजता ते नया घाट या ठिकाणी शरयू आरती आरती करतील आणि मग लखनौसाठी निघतील.