अयोध्या : ज्यांनी राम मंदिराचा विरोध केला त्यांच्यासोबत सरकार स्थापन केल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मंदिर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मंदिर वही बनायंगे, तारीख नही बतायंगे असा आरोप केला जात होता. पण, नरेंद्र मोदी यांनी मंदिर बनवणं सुरू केलं. तारीखही सांगितली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अयोध्येत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अयोध्या येथून आम्ही प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जाणार आहोत. राम यांनी वडिलांना दिलेलं वचन पाळलं. कुणीतही सांगितलं वनवास भोगायचा आहे. तो वचन त्यांनी पूर्ण केला. १४ वर्षांसाठी राम वनवासात गेले. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की, अयोध्येत मंदिर झालं पाहिजे. त्याच्या विरोधात जाऊन सरकारच्या आमिषाने काँग्रेस सोबत सत्तेत गेले. असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
गेल्या आठ-नऊ वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले. काही लोकं म्हणतात, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पण मी अयोध्येत असलो तरी सचिव, जिल्ह्याधिकारी यांच्यासोबत संपर्कात आहे. घटनास्थळी भेट द्या. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तिथं जा, असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. आदेश देऊन घरी बसणारा मी मुख्यमंत्री नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सर्वांनी रामलल्ला यांचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. त्यानंतर ते दिल्लीला गेले. शरयू नदीवर आरती आहे. संत महंतांच्या आशीर्वादाचा कार्यक्रम आहे. कित्तेकांना यामुळे अॅलर्जी आहे. पण, मी एक गोष्ट सांगणार राम मंदिर आणि अयोध्या हा आस्था आणि श्रद्धेचा विषय आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं.
अयोध्येतील राममंदिर लाखो लोकांना आनंद देणारी बाब आहे. पण, काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. हिंदू धर्माविषयी चुकीची माहिती दिली जाते. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. सर्वांना घेऊन जाणारा असा हा धर्म आहे. २०१४ मध्ये हिंदुत्वाच्या विचाराची सरकार आली. मान-सन्मान मिळाला. तत्पूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, गर्व से कहो हम हिंदू हैं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे विचार एक आहेत, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.