मुंबई, हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते. अनेक जण या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवासही ठेवतात. असे मानले जाते की, सोमवारी व्रत (Somwar Vrat) केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः जे आर्थिक समस्येतून जात आहेत त्यांनी काही उपाय केल्यास यातून निश्चितपणे मार्ग निघतो.
जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर दुधात पाणी मिसळून अर्पण करावे. यासोबतच रुद्राक्षाच्या माळाने ‘ओम सोमेश्वराय नमः’ चा सुमारे 108 वेळा जप करा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूधमिश्रित पाण्याने अर्घ्य अर्पण करावे. हा उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते.
जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असेल तर सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. सलग 7 सोमवार हा उपाय केल्यास ग्रह दोष दूर होऊ शकतात. यासोबतच इच्छित फळही मिळते.
काळे तीळ दान करा : आर्थिक लाभासाठी सोमवारी संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चा तांदूळ एकत्र करून दान करावे. असे केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. यासोबतच तुमच्या आयुष्यातील समस्याही दूर होतात.
जल अभिषेक करा: आर्थिक चणचण, आरोग्याची समस्या, वैवाहिक जीवनातील समस्या तसेच दीर्घ आयुष्यासाठी दर सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. या सोबतच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. सोमवारच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार टाळावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)