नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Sitharaman ) यांनी २०२३-२४ साठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget) सादर केला. आपल्या पाचव्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विशेषता विकास, टॅक्स, कृषी, हरीत विकास, युवा शक्ती यासह आणखी काही घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी आयकराची मर्यादा वाढवून पाच लाख रुपयांवरून ती सात लाख रुपये केली. अर्थमंत्री सीतारामण यांनी ८७ मिनिटे भाषण केलं. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणापेक्षा ३ मिनिटे कमी आहेत. सीतारामण यांच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय भाषणातील काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामण यांनी टॅक्स या शब्दाचा वापर सर्वात जास्त वेळा केला. याशिवाय विकास, स्टेट, फायनान्स, योजना, अर्थव्यवस्था, कस्टम ड्युटी, युवा शक्ती, कृषी, हरीत विकास या शब्दांचा वापर जास्त वेळा केला.
अर्थसंकल्पात नॅशनल डाटा गव्हर्नर पॉलिसी, केवायसी प्रक्रिया, विकास या शब्दांचाही उल्लेख त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात जास्त वेळा केला. अर्थमंत्री सीतारामण यांनी आपल्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. पॅनकार्ड डिटीटल देण्या-घेण्यासाठी उपयोगी ठरेल, असंही सांगितलं.
टॅक्स – ५१
विकास – २८
राज्य – २७
फायनान्स – २५
कृषी – २५
हाउसिंग – २४
योजना – २२
इकॉनॉमी – २१
कस्टम ड्युटी – २०
बँक – १८
डिजीटल – १७
क्रेडीट – १७
ग्रीन – १६
उत्पादन – १३
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत ८७ मिनिटांचे भाषण केले. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात टॅक्स शब्दाचा जास्तीत-जास्त वेळा उल्लेख केला. याशिवाय विकास, स्टेट, फायनान्स यासारख्या शब्दांचा जास्त वेळा उल्लेख केला.
गेल्या वर्षी वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपल्या भाषणात सर्वात जास्त वेळा टॅक्स या शब्दाचा उल्लेख केला होता. गेल्या अर्थसंकल्पीय भाषणात टॅक्सशिवाय डिजीटल, ऑनलाईन, फायनान्स, इकॉनॉमी, एज्युकेशन आणि हेल्थ या शब्दांचा उल्लेख जास्त वेळा केला होता.