मुंबई : पीडब्लूसी इंडिया (PWC India)ने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टॅक्स डिडक्शनचा लाभ देण्याचा विचार करत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हातात पैसा खेळता राहील आणि बाजारात मागणी वाढेल, असं पीडब्लूसी इंडियाचं म्हणणं आहे. केंद्र सरकारही मागणीचं प्रमाण वाढावं हाच विचार करत आहे.(If you work from home, you can get a higher salary!)
बाजारात मागणी वाढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या हातात जास्त पैसा सोडण्याची गरज आहे. त्याचबरोबर एक विचार असाही आहे की, कोरोना महामारीचा विचार करता छोट्या आणि मध्यम वर्गातील करदात्यांना करात सवलत दिली जावी. खास करुन वर्क फ्रॉम होम करणाऱ्या पगारदारांना त्याचा लाभ मिळावा, असं मत पीडब्ल्यूसी इंडियाचे राहुल गर्ग यांनी म्हटलं आहे. वर्क फ्रॉम होम करताना जो खर्च केला जात आहे, जो की ऑफिसमध्ये काम करत असताना कंपनीकडून केला जातो. त्या खर्चाची कपात कर्मचाऱ्यांच्या वेतनातून केली जाऊ शकते. ज्यामुळे त्यांचा कर वाचेल आणि त्यांच्या हातात जास्त पैसा राहील, अशी सूचनाही गर्ग यांनी केली आहे.
हा उपाय पूर्णपणे न्यायिक असेल. कारण कंपन्यांनी हा खर्च उचलला असता तर त्यांच्यातून हा कापता येऊ शकणारा खर्च होता. आज तिच कापता येऊ शकणारी रक्कम ही पगारदार नोकरदारांच्या खात्यात असेल आणि त्यामुळे उत्पन्नातही कुठली कमतरता भासणार नाही. त्यामुळे लोकांकडे जास्त पैसा राहील आणि बाजारातील मागणीही वाढेल, असं गर्ग यांचं म्हणणं आहे.
भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांनाला चालना देत आहे. दरम्यान, भारतात टेस्ला आणि टाटाने आजकाल उत्तम इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. वर्ष 2015 मध्ये सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने फेम (Faster Adoption and Manufacturing of (Hybrid &) Electric Vehicles) योजना जाहीर केली. या अर्थसंकल्पातही ऑटो वाहन आणि विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकार काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Budget 2021: करदात्यांना झटका बसण्याची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कररचनेत बदल होणार?
If you work from home, you can get a higher salary!