नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget 2021 session live) आजपासून सुरु झालं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा वर्ष 2021-22 चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन सत्रांमध्ये चालणार आहे. पहिलं सत्र 15 फेब्रुवारीपर्यंत तर दुसरं सत्र 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या, डोंबिवली, शेलार नाका परिसरातील घटना, टिळक नगर पोलीसांची प्राथमिक माहिती,मयत पत्नीचे नाव मनीषा यादव, आरोपी पतीचे नाव शिवकुमार यादव, टिळकनगर पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 8 महिन्यात 80 कोटी जनतेला महिन्याला 5 किलो अतिरिक्त रेशन फुकट मिळालं. सरकारने प्रवासी कामगार, मजूर आणि आपल्या घरापासून लांब राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही काळजी घेतली – राष्ट्रपती
माझ्या सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करुन, दीडपट MSP देण्याचा निर्णय घेतला. माझं सरकार आज केवळ MSP ने खरेदी करत नाही तर खरेदी केंद्रांची संख्याही वाढवत आहे- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
मेरी सरकार ने स्वामीनाथन आयोग की सिफ़ारिशों को लागू करते हुए लागत से डेढ़ गुना MSP देने का फैसला भी किया था। मेरी सरकार आज न सिर्फ MSP पर रिकॉर्ड मात्रा में खरीद कर रही है बल्कि खरीद केंद्रों की संख्या को भी बढ़ा रही है: राष्ट्रपति रामनाथ कोविंद pic.twitter.com/zKuDwOvcVt
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2021
नुकतंच प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याचा अपमान होणं दुर्दैवी आहे. जे संविधान आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, तेच संविधान आपल्याला कायदे आणि नियमांचं पालन करण्यासाठी शिकवतं – राष्ट्रपती
सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले, पंतप्रधान किसान योजनेचा देशातील लहान शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. संसदेने कृषी विधेयकं मंजूकर केली, नवीन विधेयकांमुळे शेतकऱ्यांना लाभ. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला तिरंग्याचा झालेला अपमान ही दुर्दैवी घटना.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा 10 कोटी छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं करेल. पूर्वीच्या कायद्यातील सुविधा रद्द करण्यात आल्या नाहीत. कृषी कायद्यांविषयी गैरसमज पसरवण्यात आले ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 100 किसान रेल्वे सुरु केल्या गेल्या.
सरकारने कृषीमालांना दीडपट हमी भाव दिला, सरकारी खरेदी केंद्रही वाढवली – राष्ट्रपती
केंद्र सरकारने वैद्यकीय महाविद्यालये वाढवली, आज देशात ५६२ वैद्यकीय महाविद्यालयं आहेत – राष्ट्रपती
सहा राज्यात गरिब कल्याण योजना सरकारने राबवली, सरकारच्या प्रयत्नांमुळे गरिबांची मदत झाली आहे, त्यांना सुविधा मिळाली आहे, ओरोग्याबाबत गरिब जनतेचा खर्चही वाचला आहे,
आव्हानं कितीही मोठी असली तरी भारत थांबणार नाही, गेल्या वर्षात भारताने अनेक संकटांना तोंड दिलं – राष्ट्रपती
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे भारतातील लोकशाही मजबूत झाली. केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा देशातील जनतेला झाला. कोरोनानं आत्मनिर्भर भारताचं महत्व पटवून दिलं. कमी कालावधीमध्ये 200 प्रयोगशाळा निर्माण केल्या. भारत सर्वात मोठं लसीकरण अभियान चालवतोय, याचा अभिमान आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात होणारं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं आहे. नवीन वर्ष आणि नवं दशक आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षात प्रवेश करत आहोत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला सुरुवात झाली. भारताने प्रत्येक आव्हानाचा धाडसाने सामना केला. आपत्तीच्या काळात देशाने एक होऊन लढा दिला, असं राष्ट्रपती म्हणाले.