नवी दिल्ली : बजेटबद्दल सामान्य व्यक्तीच्या मनात उत्सुकता असते. शेवटी काय महाग आणि काय स्वस्त झाले. दुसरी आवड असते आयकराच्या स्लॅबमध्ये. आयकर पाच लाख रुपयांवरून वाढवून सात लाख रुपये करण्यात आलंय. याचा अर्थ आता सात लाख रुपयांपर्यंत कोणत्याही कर लागणार नाही. याशिवाय एलईडी टीव्ही, मोबाईल (LED TV-Mobile) फोन, खेळाचे साहित्यांसह अन्य काही वस्तूंच्या किमती कमी झाल्यात. सिगारेटची (Cigarettes) किंमत वाढली. खालील यादीतून काय स्वस्त आणि काय महाग झालं हे कळेल.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा त्यांचा पाचवा बजेट सादर केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी सरकारचं हे पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात मोठ-मोठ्या सेक्टरसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. परंतु, सामान्य व्यक्तीसाठी काय महाग आणि काय स्वस्त झालं.
२०२३ च्या बजेटमध्ये महिलांचे दागिने स्वस्त झाले. विदेशातून येणारे चांदीचे साहित्य, प्लॅटिनम आणि एक्सरे मशीन महाग झालेत. पाहुयात काय महाग आणि काय स्वस्त झालंय ते…
एलईडी टीव्ही
खेळाचे साहित्य
मोबाईल कॅमेरा लेन्स
इलेक्ट्रिक गाड्या
हिऱ्याचे दागिने
शेतीचे साहित्य
लिथियम सेल्स
सायकल
सिगारेट
दारू
छत्री
सोना
विदेशातून येणारे सोने, चांदी
प्लॅटिनम
एक्सरे-मशीन
हिरा
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी असा अंदाज होता की, केंद्र सरकार २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प आकर्षिक असेल. आयकराच्या रचनेत बदल करण्यात आले. शेतकरी, व्यावसायिक, मजूर यांना या अर्थसंकल्पातून दिलासा मिळाला. सामान्य जनतेला हा अर्थसंकल्प पसंत पडल्याचं दिसते. सात लाख रुपयांपर्यंत अर्थसंकल्पात आयकरात सुट देण्यात आली. दागिने स्वस्त केल्यामुळं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.