पूर्ण अर्थसंकल्प या महिन्याच्या अखेरच्या सत्रात मांडला जाईल. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत विकासाची ब्लूप्रिंट सादर केली. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर ध्यनवाद प्रस्तावादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा सादर केला. भारताला विकसीत राष्ट्र करण्याचा आमचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. भारताला जागतील टॉप-3 अर्थव्यवस्था करण्याचा दृढ संकल्प घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी 5 वर्षे देशाच्या गरिबीविरोधात लढण्यासाठी निर्णायक असतील असे त्यांनी सांगितले.
जगातील टॉप-3 अर्थव्यवस्थेत स्थान
भारताला जगातिक अर्थव्यवस्थेत टॉप 10 वरुन सध्या पाचव्या क्रमांकावर आणण्यात मोठे यश आले आहे. आता पुढे जाण्यात अनंत अडचणी आहेत. कोरोना महामारी आणि जागतिक भूराजकीय घडामोडींमुळे काही वेळ ब्रेक लागला. आता देशातील जनतेने आम्हाला 5 व्या क्रमांकावरुन 3 क्रमांकावर अर्थव्यवस्था आणण्यासाठी जनादेश दिल्याचे ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भारत टॉप-3 अर्थव्यवस्थेत स्थान पटकावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, तेव्हा त्याचा प्रभाव अनेकांच्या जीवनावर पडेल. टिअर-2 आणि टिअर-3 शहरे हे त्यासाठी विकासाचे इंजिन ठरतील, असे ते म्हणाले.
आता लढा गरिबीविरोधात
पुढील पाच वर्षांत गरिबीविरोधात लढण्यासाठी निर्णायक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गरिबालाच गरिबीविरोधात लढण्यासाठी बळ देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या 10 वर्षांतील अनुभवावरुन देश गरिबीविरोधात विजयी होणार असल्याचा दावा त्यांनी केला. या कार्यकाळात देशात नवीन स्टार्टअप्स आणि नवीन कंपन्यांचा विस्तार पाहायला मिळेल. याशिवाय सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत मोठा बदल होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या विकासावर लक्ष
सबका साथ, सबका विकास हा मूल मंत्र असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. आता किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढविण्यावर आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या कार्यकाळात शेतकरी कल्याणाच्या बाता मारण्यात आल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. PM Kisha Scheme मध्ये आतापर्यंत 10 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला. गेल्या 6 वर्षांत 3 लाख कोटी शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे ते म्हणाले.