2024 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्प सादर करत आहेत. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये वेगवेगळ्या सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या सगळ्यात सर्वसामान्यांसाठी महत्वाची बाब म्हणजे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात आणि कोणत्या वस्तू या महाग झाल्यात… यंदाच्या बजेटनंतर काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? याची संपूर्ण यादी तुम्हाला या बातमीत तुम्हाला वाचायला मिळणार आहे.
कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार आहेत. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही. त्यामुळे कॅन्सर रुग्णांसाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. तर पीवीसी फ्लेक्स बॅनर महाग होणार आहेत.
पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या बजेटमध्ये खास प्रयोजन करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत शहरी गरिबांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. शहरी आवास योजनेसाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 1 कोटी शहरी गरिबांसाठी घर बांधणार आहेत. मध्यमवर्गीयांना सुद्धा या योजनेचा फायदा होईल. आता TDS वेळेवर न भरणं गुन्हा असणार नाही.
यंदाच्या बजेटमध्ये करदात्यांसाठी काही घोषणा करण्यात आली आहे. किती लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही? याबाबत निर्मला सीतारमण यांनी संसदेत माहिती दिली. नव्या कर प्रणालीत स्टँडर्ड डिडक्शन 50 हजार वरुन 75 हजार करण्यात आलंय. 3 लाखापर्यंतच्या उत्पनावर कर लागणार नाही. 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पनावर 5 टक्के कर लागणार आहे. 7 ते 10 लाखापर्यंत उत्पन्नावर 10 टक्के कर लागणार आहे. 10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्नावर 15 टक्के कर लागले. 12 ते 15 लाख उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स लागेल. 15 लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर लागणार आहे.