मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला आहे. 23 जुलै रोजी या सरकारचे पहिले केंद्रीय बजेट सादर होईल. मोदी सरकार या अर्थसंकल्पात सामाजिक सुरक्षेतंर्गत येणाऱ्या अनेक योजनांची व्याप्ती वाढविण्याची शक्यता आहे. यामध्ये आयुष्यमान भारतची चर्चा आहे. त्यासोबतच अटल पेन्शन योजनेत पण मोठा बदल होण्याची चिन्ह आहेत. या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या हाती महिन्याकाठी मोठी रक्कम गाठीशी असेल. काय होऊ शकते घोषणा?
किमान राशीत दुप्पट वाढ
मोदी सरकारच्या कार्यकाळात अनेक बदलांची नांदी संभवत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा योजनेतंर्गतची मुख्य योजना अटल पेन्शन स्कीमची रक्कम दुप्पट करण्यात येऊ शकते. या बजेटमध्ये याविषयीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशातील लाखो पेन्शनधारकांना त्याचा फायदा होईल.
रक्कम वाढविण्याची शक्यता
Economic Times च्या एका अहवालानुसार, अटल पेन्शन योजना अधिक आकर्षक करण्यावर भर देण्यात येत आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पण तयार आहे. यामध्ये हमीपात्र रक्कम वाढविण्याचा विचार आहे. बजेटमध्ये याविषयीची घोषणा होऊ शकते. सध्या सरकार हमीपात्र लाभासह योगदान रक्कमेनुसार, 1,000 ते 5,000 रुपये प्रति महिना कमीत कमी निवृत्ती वेतन देते. पण सामाजिक सुरक्षा धोरण मजबुतीसाठी कामगार संहिता लागू होऊ शकते.
पेन्शनची रक्कम वाढविण्यावर का भर?
गेल्या महिन्यात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाचे (PFRDA) अध्यक्ष दीपक मोहंती यांनी एक महत्वाची माहिती दिली होती. त्यानुसार, 2023-24 मध्ये अटल पेन्शन योजनेतंर्गत अर्जांची संख्या 2015 नंतर सर्वाधिक झाली आहेत. 20 जूनपर्यंत या योजनेत एकूण 66.2 दशलक्ष अर्ज दाखल जाले. तर 2023-24 मध्ये योजनेतंर्गत 12.2 दशलक्ष नवीन खाते उघडण्यात आले. त्यामुळे ही योजना लोकप्रिय ठरत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सध्याची हमीपात्र रक्कम पर्याप्त नाही. त्यामुळे प्राधिकरण ही रक्कम वाढविण्यावर भर देत आहे. रक्कम वाढविल्यास लाभार्थ्यांची संख्या अधिक वाढेल, हे त्यामागील गृहितक आहे.
काय आहे अटल पेन्शन योजना?
अटल पेन्शन योजना (APY) 2015-16 मध्ये पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने सुरु केली होती. ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टिमशी जोडण्यात आलेली आहे.