मोदी 3.0 चे पहिले बजेट आणि आर्थिक वर्ष 2024-25 चे पूर्ण बजेट पुढील महिन्याच्या अखेरीस सादर होण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. हे बजेट सादर करत असतानाच त्या एक नवीन विक्रम स्वतःच्या नावे करणार आहेत. तर यंदा त्या कोणत्या परंपरेला छेद देतील आणि त्याऐवजी नवीन पायंडा पाडतील याकडे पण अनेक तज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे.
सातव्यांदा सादर करतील बजेट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सातव्यांदा बजेट सादर करतील. यापूर्वी माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावे 6 बजेट सादर करण्याचा विक्रम आहे. देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी देसाई यांनी अनेकदा अर्थमंत्री म्हणून पदभार संभाळला आहे. यावेळी सीतारमण या सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करतील. देशातील पहिली पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणूनही त्यांच्या नावे विक्रम आहे.
सीतारमण यांनी केला असा बदल
अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांच्या बजेट भाषणादरम्यानच्या साड्यांच्या रंगाची यापूर्वी चर्चा झाली. तर त्यांनी अनेक परंपरांना पण छेद दिला. काही नवीन पायंडे पाडले.
1. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2019 मध्ये पहिले बजेट सादर केले. त्यावेळी इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येणारी ब्रीफकेस बंद केली. त्याऐवेजी त्यांनी लालरंगाची चोपडी वापरली. त्याला वहिखाते पण म्हटल्या जाते.
2. कोरोना काळात, 2021 मध्ये त्यांनी देशाचे पहिले पेपरलेस बजेट सादर केले. त्या एक टॅबलेट घेऊन संसदेत पोहचल्या. त्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचले. वहीखात्याऐवजी एका लाल रंगाच्या फोल्डरमध्ये टॅब आणला होता.
3. 2022 मध्ये पण त्यांनी नवीन पायंडा पाडला. देशात प्रत्येक वर्षी बजेट प्रत छापण्यापूर्वी हलवा खाऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. कोरोनाचा प्रभाव पाहता, त्यांनी या परंपरेला छेद दिला. त्याऐवजी त्यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना मिठाई वाटप केली. पण हलवा कार्यक्रम बंद करण्यात आलेला नाही.
4. गेल्या वर्षी 2023 मध्ये त्यांचे बजेट भाषण एकदम वेगळे ठरले. त्यांनी गेल्यावर्षी कर व्यवस्थेत अमुलाग्र बदल केला. त्यांनी नवीन कर प्रणाली लागू केली. तर उत्पन्न स्तराचा एक निश्चित संचाला, आयकर स्लॅबमध्ये मोठा बदल केला. त्यांनी ही नवीन कर प्रणाली डिफॉल्ट टॅक्स सिस्टिम म्हणून लागू केली.