Budget (Marathi) 2021 LIVE : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प (Budget) सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. यावेळी सीतारमण यांची लाल रंगाची साडी लक्ष वेधून घेत आहे. (Nirmala Sitharaman dons red saree for 2021-22 budget presentation)
बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या पेहरावाकडेही सर्वसामान्य जनतेचे लक्ष असते. निर्मला सीतारमण यांना क्लासी हँडलूम आणि सिल्क साड्यांची आवड आहे. सीतारमण यांनी बजेटवेळी लाल आणि क्रीम रंगाची साडी नेसली. सोन्याची चेन, बांगड्या आणि कानातले असा साधा लूक पाहायला मिळाला.
लाल रंग हा प्रेम, ऊर्जा, शक्ती यांचे प्रतीक मानला जातो. मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा आणि ताकद देण्यासाठी निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाच्या साडीची निवड केल्याचे म्हटले जाते.
पूर्वी चामड्याच्या ब्रीफकेसमधून बजेटची कागदपत्रं आणली जायची. मात्र, निर्मला सीतारमण यांनी ही परंपरा मोडित काढली. त्यांनी वहीखाते घेऊन जाण्याची परंपरा सुरु केली होती. ऊर्जेचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाल रंगाच्या पोतडीत त्या बजेटची कागदपत्रं आणत.
केंद्र सरकारने यंदा विनाकागद कारभार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच पेपरलेस अर्थसंकल्प सादर होणार आहे. मेड इन इंडिया टॅबद्वारे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललं गेलेलं हे पाऊल आहे. हा टॅबही लाल रंगाच्या कापडात ठेवलेला आहे.
अॅपची निर्मिती
सरकारने डिजिटल बजेट सादर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा बजेट जनतेपर्यंत पोहोचावा म्हणून त्यांनी ‘Union Budget Mobile App’ची निर्मिती केली आहे. या अॅपद्वारे सामान्य लोकांनाही बजेट पाहता, वाचता येणार आहे. (Nirmala Sitharaman dons red saree for 2021-22 budget presentation)
Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman will present and read out the #UnionBudget 2021-22 at the Parliament through a tab, instead of the traditional ‘bahi khata’. pic.twitter.com/Ir5qZYz2gy
— ANI (@ANI) February 1, 2021
संबंधित बातम्या :
Budget 2021: काय स्वस्त होणार आणि काय महागणार?
Budget 2021 सादर होण्याआधीच सरकारला मिळाली Good News, जानेवारीत ‘असा’ झाला फायदा
(Nirmala Sitharaman dons red saree for 2021-22 budget presentation)