Railway Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या आधी रेल्वेमंत्र्यांनी या नव्या सुविधेचा व्हीडीओ केला शेअर

| Updated on: Feb 01, 2023 | 8:11 AM

रेल्वेच्या प्रसाधनगृहात अपग्रेडेड सुविधा देण्यात आली आहे. यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरीकांच्या सोय होणार आहे. रेल्वेत युरोपीयन पद्धतीचे कमोड टॉयलेट बसविण्यात आले आहे. या नव्या प्रसाधनगृहात दुर्गंधीची तपासणी स्वयंचलीतपणे होणार आहे,त्याचा व्हीडीओ पाहूया

Railway Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या आधी रेल्वेमंत्र्यांनी या नव्या सुविधेचा व्हीडीओ केला शेअर
Railway_toilet
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : कोणतेही सार्वजनिक टॉयलेट ( toilet ) म्हटलं की नाक मुठीत धरून आत शिरावे लागते असा सर्वसाधारण अनुभव असतो. रेल्वेच्या ( railway ) टॉयलेटची पण तऱ्हा काय वेगळी नसते. परंतू रेल्वेने सर्व प्रवासी गाड्यांमधी टॉयलेटला बायो-टॉयलेट ( biotoilet in railway ) लावल्याने आता प्रवाशांना चांगल्या सुविधेसह पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. आता आणखीन पुढे जात भारतीय रेल्वेने लांबपल्ल्याच्या मेल-एक्सप्रेसमध्ये युरोपीयन स्टाईल कमोड बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या टॉयलेटची पाहणी स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( AshwiniVaishnaw ) यांनी केले आहे. या जादा सुविधाजनक टॉयलेटचा व्हीडीओच रेल्वेमंत्र्यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. पाहूया काय आहे नेमकी सुविधा…

भारतीय रेल्वेने सर्व रेल्वेगाड्यांमध्ये पर्यावरणी बॉयोटॉयलेट बसविण्याचे टार्गेट नुकतेच पूर्ण केले आहे. आता रेल्वेगाड्यांमध्ये अधिक सुविधाजनक प्रसाधनगृहांची सोय करण्यात येणार आहे. आधीच्या बैठ्या टॉयलेट ऐवजी रेल्वे आता युरोपीयन स्टाईलची कमोड सिस्टीम रेल्वेत लवकरच लॉंच करणार आहे. या कमोड पद्धतीच्या नव्या अपग्रेडड
टॉयलेटची पाहणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

दुर्गंधी वाढल्यास आपोआप कॉल जाणार

रेल्वेच्या प्रसाधनगृहात अपग्रेडेड सुविधेत महिला आणि ज्येष्ठ नागरीकांच्या सोयीसाठी कमोड पद्धतीचे टॉयलेट बसविण्यात आले आहे. या नव्या प्रसाधनगृहात दुर्गंधीची तपासणी स्वयंचलीतपणे होणार आहे, आणी यासंबधीचा अलर्ट सफाई दलाकडे जाण्याची सोय आहे. त्यासाठी दुर्गंधीचा इंडीकेटर तैनात करण्यात आला आहे. टॉयलेटमध्ये दुर्गंधी वाढल्यास आपोआप समजणार आहे. त्यामुळे सफाईचे नियंत्रण सोपे झाले आहे. यासंबंधी सफाई कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर संदेश जाण्याची सोय आहे.

 

प्रसाधनगृहाच्या नळाची सुरक्षा

रेल्वेच्या प्रसाधनगृहातून नळाच्या तोट्या चोरीला जाण्याच्या बऱ्याचदा उजेडात आल्या आहेत. यात बहुतांश वेळा रेल्वेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रसाधनगृहातील वॉश बेसीनला असलेल्या नळाच्या तोट्या अधिक सुरक्षित करण्यात आल्या आहेत. या प्रसाधनगृहाची तपासणी केल्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या स्टाफचे कौतूक करीत ही नवी सुविधा प्रवाशांसाठी उत्तम असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.