मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पेट्रोल डिझेलवर लावलेल्या कृषी अधिभारावर सडकून टीका केलीय. पेट्रोल डिझेलवर अधिभार लावून पेट्रोल 1000 रुपये लिटर करुन सर्वसामान्यांना सरकारला मारायचं असेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच, केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे परिणाम आगामी 6 महिन्यांत कळतीलच. खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशी स्थिती केंद्र सरकारची झाली आहे, असेही राऊत म्हणाले. ते मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. (government wants to kill the common man by imposing charges on petrol and diesel said sanjay raut)
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज ( 1 फेब्रवारी) मांडला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. यावेळी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधीभार लावला आहे. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच कारणामुळे राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन सरकारला लोकांना मारायचं आहे, अशी टीका राऊत यांनी केलीये. तसेच आगामी काळात काही राज्यांत होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारने आर्थिक तरतूद केली असेल, तर हा अर्थसंकल्प देशाचा नसून तो एका पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असा घणाघात राऊत यांनी केला.
यावेळी केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी केलेल्या तरतुदीवरुन राऊत यांनी सरकारला घेरलं आहे. त्यांनी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रसाठी काहीही नाही, अस म्हणत या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला शोधण्याचा प्रयत्न करतो अशी खोचक टीका केलीये. तसेच सामान्य माणसाला पोटाची आणि भुकेची भाषा कळते. तरुणांना रोजगाराची भाषा कळते. यांच्यासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद केलेली आहे, असा सवालही त्यांनी केला आहे.
संबधित बातम्या :
(government wants to kill the common man by imposing charges on petrol and diesel said sanjay raut)