नवी दिल्ली – अर्थतज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, अर्थव्यवस्था नीट चालावी यासाठी कोणत्याही देशाचे बजेट म्हणजे त्याचा कणा असतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आज त्यांचा पाचवा अर्थसंकल्प (Union Budget 2023)) सादर करणार आहेत. हेल्थ सेक्टरपासून ते इतर सर्व सेक्टर्सना या बजेटकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. कोरोना महामारीचा सामना केल्यानंतर आरोग्य यंत्रणेतील काही त्रुटी समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री बजेटमध्ये त्या त्रुटी कमी करण्यासाठी हेल्थ बजेट (health budget) वाढवण्यासोबतच सध्याच्या आरोग्य योजनांची व्याप्ती वाढवतील असा अंदाज आहे.
गेल्या आठवड्यात रोजी निर्मला सीतारामण यांनी हलवा सोहळ्याची परंपरा पुन्हा सुरू केली. दरवर्षी बजेट सादर होण्यापूर्वी हलवा सोहळा (Halwa Ceremony) साजरा केला जातो. कोरोना काळात हलवा सोहळ्याला ब्रेक लागला होता. पण यंदा हलवा सोहळा साजरा करण्यात आला. हलवा सोहळा हा या बजेटसाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी श्रम परिहार समजला जातो. ही परंपरा अनेक दशकांपासूनची आहे.
हेल्थ सेक्टरला बजेटकडून अनेक अपेक्षा आहेत. कोरोनाच्या प्रकोपापासून सध्यतरी देशवासियांना दिलासा मिळाला आहे, मात्र कोरोनाचा प्रकोप वाढलेला असताना अनके लोकांना त्याचा सामना केला, काहींना त्यात प्राणही गमवावे लागले. या पार्श्वभूमीवर सर्वांना अशी आशा आहे की यावेळचा अर्थसंकल्प भविष्यात अशा साथीच्या आजारांपासून आपल्या आरोग्य यंत्रणेची सज्जता मजबूत करण्यास मदत करेल.
हेल्थ बजेटमध्ये व्हावी वाढ
तज्ज्ञांच्या मतानुसार, हेल्थ बजेटमध्ये गेल्या दशकभरापासून वाढ होत आहे. मात्र असे असले तरीही आपल्या देशाचे हेल्थ बजेट जीडीपीच्या (GDP)च्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे या वर्षी हेल्थ बजेटमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले गेले पाहिजे.
आयुष्मान भारतची व्याप्ती वाढावी
आपल्या देशात मोठ्या प्रमाणात असे लोकं आजही आहेत, ज्यांच्याकडे हेल्थ इन्श्युरन्सची कोणतीही सुविधा नाही. तरीही आयुष्मान भारत योजनेअंतर्गत परिस्थितीत थोडीफार सुधारणा झाली आहे. ‘डिजिटल इंडिया’ योजनेअंतर्गत, केंद्र सरकारने राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश आरोग्य क्षेत्रातील लोकांना जागरूक करणे आणि त्यांना आरोग्य अभियानाशी जोडणे हा आहे.
मात्र आयुष्मान भारत योजनेच्या व्याप्ती संदर्भात बजेटकडून काय अपेक्षा आहेत? खरंतर रोबोटिक सर्जरी वाढवण्याची आवश्यकता आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला पाहिजे. यामुळे जनसामान्यांनाही याचा लाभ मिळू शकेल.