नवी दिल्ली : तुम्ही दररोज रोखीतच (Cash) व्यवहार करत असाल तर, तुम्हाला माहिती आहे का, या नोटा छपाईसाठी किती खर्च (Printing Cost) येतो ते? 10, 20 वा 50 रुपयांच्या नोटांसाठी केंद्र सरकार (Central Government) किती रुपये खर्च करत असेल? या वाढत्या महागाईचा (Inflation) परिणाम नोटांच्या छपाईवर ही झाला असेल का? महागाईमुळे हा खर्च वाढला असेल का?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून नोट मुद्रन लिमिटेडकडून नोटा छापण्यात येतात. Right To Information अंतर्गत मिळालेल्या आकड्यानुसार, FY22 मध्ये 10 रुपायांच्या नोटेसाठी 1 रुपयांपेक्षा कमी म्हणजे 95 पैसे खर्च येत होता.
तर 50 रुपयांच्या नोटेसाठी 1.13 रुपये खर्च येतो. तर 100 रुपयाच्या नोटेसाठी 1.77 रुपये, 200 रुपयांच्या नोटेसाठी 2.37 रुपये खर्च तर 500 रुपयांच्या नोटेसाठी 2.29 रुपयांचा खर्च आला. अर्थात याचा भार सरकारच्या तिजोरीवरच पडला.
गेल्या वर्षीपेक्षा या आर्थिक वर्षात ( FY22) नोटा छापण्यासाठी केंद्र सरकारला अधिकचा खर्च आला. 50 रुपयांच्या नोटेसाठी यंदा 23 टक्के खर्च वाढला आहे. तर 20 रुपयांच्या नोटेसाठी केवळ एक पैसा खर्च येतो.
500 रुपयांच्या नोटांच्या छपाईसाठी खर्चात काहीच वाढ झाली नाही. एकूण RBI ने नोटा छापण्यासाठी एकूण गेल्या वर्षाच्या तुलनेत 24 टक्क्यांपेक्षा अधिकची रक्कम खर्च केली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात नोटा छपाईसाठी 4012.09 कोटी रुपयांचा खर्च आला होता. पण यंदा हा खर्च वाढला आहे. केंद्र सरकारला नोटा खरेदीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागली आहे. या आर्थिक वर्षात (FY22) केंद्र सरकारला 4984.8 कोटी रुपयांचा खर्च आला.
2017 मध्ये नोटबंदी दरम्यान केंद्रीय बँकेला मोठा खर्च आला होता. त्यावेळी आरबीआयला खर्च करण्यासाठी 7965 कोटी रुपये खर्च करावे लागले होते. त्यापूर्वी नोटा छापण्यासाठी 3421 कोटी रुपये खर्च आला होता. नोटबंदीच्या काळात 133% खर्च वाढला होता.