नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : जगात अशा अनेक कंपन्या आहेत, ज्यांची स्वतःची अनेक उत्पादनं आहेत. पण त्याची माहिती फार थोड्या ग्राहकांना असते. देशात टाटा, बाटा, हिंदूस्थान लिव्हर आणि इतर अनेक कंपन्या आहेत. त्यांची उत्पादनं अनेकांना माहिती आहे. बाजारातील अशीच एक बिग जायंट कंपनी आहे. तिच्याकडे अनेक ब्रँड्स आहेत. या ब्रँड्सची बाजाराला ओळख आहे. हे उत्पादनं दररोज हातोहात खपतात. जगातील जवळपास 200 हून अधिक देशात कंपनीचे साम्राज्य आहे. दररोज 100 कोटींहून अधिक ग्राहक तिची उत्पादनं खरेदी करतात. कोणती आहे बाजारातील श्रीमंत कंपनी?
ही आहेत या कंपनीची उत्पादनं
कोणती आहे ही कंपनी
या कंपनीचे उत्पादन तुम्ही नक्कीच कधी ना कधी चाखले असेल. पण लोकांना या कंपनीचे नाव माहिती नाही. किंवा नाव माहिती असले तरी तिच्या इतर उत्पादनांची माहिती नाही. तर पेप्सिको हा तो जागतिक ब्रँड आहे. तिच्या अनेक उत्पादनांचा वापर लोक करतात, पण त्याची माहिती त्यांना नाही. वरील सर्व ब्रँड्ची पॅरेंट कंपनी ही पेप्सिको आहे. पेप्सिको ही फास्ट फूड आणि ड्रिंक उत्पादन कंपनी आहे. तिची उत्पादनं जगभर नावाजलेली आहे. पेप्सिकोच्या फूड पोर्टफोलिओमध्ये स्नॅक्स, न्यूट्रिशियन्स फूड आणि बेव्हरेज यांचा समावेश आहे.
पेप्सिकोचे आज 200 हून अधिक देशात ग्राहक आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर केलेल्या दाव्यानुसार, जगभरातील 100 कोटींहून अधिक ग्राहक दररोज उत्पादने वापरतात. 2022 मध्ये पेप्सिकोने 86 अब्ज डॉलरचा महसूल मिळवला. पेप्सिकोच्या इतर उत्पादनांचा वार्षिक महसूल 1 अब्ज डॉलरपेक्षा अधिक आहे. या कंपनीची स्थापना 1898 मध्ये झाली. तर Lays सुरुवात 1932 मध्ये करण्यात आली. या कंपनीची उत्पादनं लॅटिन अमेरिका, युरोप, आशिया-पॅसेफिक, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन, आफ्रिका, मध्य-पूर्वेतील देशांसह सर्वच भागात पोहचतात.