रायगड : जिल्ह्यातील बियर व्यवसायिक (Beer sellers) मालामाल झाले आहेत. त्याला कारण देखील तसेच आहे. यंदाच्या उन्हाळ्यात रायगडकरांनी तब्बल 27 लाख लिटर बियर (Beer) रिचवली आहे. विक्रीमध्ये बियरने देशी आणि विदेशी दारूला (Liquor) मागे टाकले आहे. 2021 मध्ये एप्रिल महिन्यात एकूण 7 लाख 53 हजार 537 बियरची विक्री झाली होती. तर या वर्षी हे प्रमाण दीड पटींपेक्षा अधिक वाढले आहे. चालू वर्षात मार्च महिन्यात तब्बल 18 लाख 8 हजार 898 बियरची विक्री झाली आहे. तर एप्रिल महिन्यात बियरची विक्री आणखी वाढली असून, एप्रिलमध्ये एकूण 18 लाख 84 हजार 545 बियरची विक्री झाली आहे. बियरची विक्री वाढण्यामागे वाढलेली उष्णता हे महत्त्वाचे कारण आहे. यंदा राज्यात कडक उन्हाळा होता. तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. रायगड जिल्ह्यात उन्हाळ्यात तापमान 38 ते 40 अंशांवर गेले होते. उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी काही जण शीतपेयांचा आधार घेत होते तर मद्यपी बियर रिचवत होते. त्यामुळे यंदा बियर विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
यंदा राज्याच्या विविध भागात उष्णतेची लाट आल्याचे पहायला मिळाले. तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. रायगड जिल्ह्यात देखील पारा 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला होता. वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या शीतपेयांचा आधार घेत होते. तर मद्यपींनी या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी चिल्ड बियरचा आसारा शोधला. याच कारणामुळे देशी व विदेशी मद्यांपेक्षा चालू वर्षात बियरची मोठ्याप्रमाणात विक्री झाली. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केवळ 7 लाख 53 हजार 537 बियरच्या बाटल्यांची विक्री झाली होती. तर यंदा एप्रिल महिन्यात हेच प्रमाण दीड पटीने वाढल्याचे पहायला मिळत आहे. यंदा तब्बल 18 लाख 84 हजार 545 बिअरची विक्री झाली आहे.
आकडेवारी पाहिल्यास आपल्याला असे आढळून येते की, 2021-22 या आर्थिक वर्षात बियरने विक्रीच्याबाबतीत देशी, विदेशी मद्य तसेच वाईनला मागे टाकले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बियरची विक्री सर्वाधिक झाली. या काळात देशी मद्याच्या 77 लाख 51 हजार 331 बाटल्या विकल्या गेल्या, विदेशी मद्याच्या 83 लाख 18 हजार सहा बाटल्या विकल्या गेल्या तर वाईनच्या एकूण 4 लाख 45 हजार 115 बाटल्यांची विक्री झाली. मात्र या सर्वांवर बियरने विक्रीच्या बाबतीत मात केली असून बियरच्या बाटल्यांची विक्रमी विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात बियरच्या एकूण 1 कोटी 34 लाख 17 हजार बाटल्यांची विक्री झाली आहे. बियर विक्रीचे प्रमाण मार्च आणि एप्रिल महिन्यात सर्वाधिक राहिले.