1 मिनिटात 27,000 कोटींची कमाई! Pepsico चा मित्र मालामाल

| Updated on: Dec 20, 2023 | 2:20 PM

Pepsico | वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरने कमाल केली. या शेअरमध्ये तुफान तेजी दिसली. कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 200 रुपयांची तेजी दिसून आली. हा शेअर 1350 रुपयांवर उघडला आणि एका मिनिटांत त्याने 1380.45 रुपयांचा विक्रम केला. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅपमध्ये जोरदार वाढ झाली. गुंतवणूकदारही मालामाल झाले.

1 मिनिटात 27,000 कोटींची कमाई! Pepsico चा मित्र मालामाल
Follow us on

नवी दिल्ली | 20 डिसेंबर 2023 : पेप्सीची सर्वात मोठी बॉटलर कंपनी वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरमध्ये 18 टक्क्यांची तेजी दिसून आली. एका मिनिटात या शेअरने सर्व रेकॉर्ड तोडले. एकाच मिनिटात कंपनीला 27 हजार कोटी रुपयांहून अधिकचा फायदा झाला. एका दिवसापूर्वीच्या वृत्ताचा परिणाम दिसला. वरुण बेव्हरेजज लिमिटेड दक्षिण अफ्रिकेतील बेवको या बेव्हरेज समूहातील कंपनी खरेदी करणार असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी दिसून आली. त्याचा फायदा कंपनीला आणि तिच्या गुंतवणूकदार कंपन्यांना झाला.

कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी

वरुण बेव्हरेजेज लिमिटेडच्या शेअरमध्ये आज तुफान तेजीचे सत्र दिसले. कंपनीचे शेअर जवळपास 200 रुपयांच्या तेजीसह 1350 रुपयांवर उघडला. एका मिनिटात हा शेअर 1380.45 रुपयांवर पोहचला. एका दिवसापूर्वी कंपनीचा शेअरमध्ये उसळला होता. पण आज त्यात कालच्या तुलनेत 18 तेजी दिसून आली. मंगळवारी कंपनीचा शेअर 1172 रुपयांवर बंद झाला.

हे सुद्धा वाचा

1 मिनिटात 27 हजार कोटींचा फायदा

या तुफान तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅप जबरदस्त वाढले. आकड्यावर नजर टाकली असता एका दिवसापूर्वी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 1,52,151.75 कोटी रुपये होते. तर कंपनीचा शेअर आज 1380.45 रुपयांवर पोहचला. तेव्हा कंपनीचे बाजारातील भांडवल 1,79,213.22 कोटी रुपयांवर पोहचले. याचा अर्थ कंपनीने एका मिनिटात 27,061.47 कोटी रुपये कमावले. प्री ओपनिंग मार्केटसह शेअर बाजाराने सुरुवातीलाच दमदार घौडदौड केली. आज बीएसई आणि एनएसई निफ्टीने जोरदार कामगिरी बजावली.

एका बातमीने शेअर एकदम तेजीत

वरुण बेव्हरेजेज लिमिटेडने (VBL) मंगळवारी दक्षिण अफ्रिकेतील शीतपेय कंपनी बेवकोसोबत तिची उपकंपनीचे अधिग्रहण केल्याचे वृत्त समोर आणले. हा सौदा 1,320 कोटी रुपयांना पूर्ण झाला. त्यामुळे वरुण बेव्हरेजला आफ्रिकी बाजारात विस्तार करण्यास मदत होणार आहे. बेवकोकडे दक्षिण आफ्रिका, लेसोथो आणि इस्वातिनीमध्ये पेप्सिकोची फ्रँचाईज आहे. या कंपनीकडे नामिबिया आणि बोत्सवानाच्या वितरणाचा अधिकार आहे. VBL च्या अंदाजानुसार हा करार 31 जुलै, 2024 पूर्वी पूर्ण होईल. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023 मध्ये बेवकोचा निव्वळ नफा 1,590 कोटी रुपये होता.