ऐन सुणासुदीत बेसन, मैदा, डाळी कडाडल्या, महागाईत 30 ते 35 टक्के वाढ

| Updated on: Nov 04, 2023 | 8:50 PM

ऐन दिवाळीच्या सणात मैदा, बेसन, पोहे, रवा, गुळ, साखर, खोबऱ्यासह तुरडाळ आणि कडधान्याचे भाव कडाडले आहेत. फराळ तयार करण्याच्या सर्व जिन्नस महागले आहेत. किरकोळ बाजारात सर्व जीवनावश्यक वस्तू 35 ते 40 टक्के महागल्याने सर्वसामान्य गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.

ऐन सुणासुदीत बेसन, मैदा, डाळी कडाडल्या, महागाईत 30 ते 35 टक्के वाढ
pulses
Image Credit source: socialmedia
Follow us on

सागर सुरवासे, सोलापूर | 4 नोव्हेंबर 2023 : दिवाळीची तयारी सर्वत्र सुरु असताना ही दिवाळी महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडणारी ठरणार आहे. ऐन दिवाळीत मैदा, खोबरं, बेसन, डाळी पासून सर्व प्रकारची कडधान्य महागल्याची एक बातमी राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाजमाध्यमावर ट्वीट केली आहे. किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गुळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींच्या दर किरकोळ बाजारात 35 ते 40 टक्के वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याची मोठी झळ बसणार आहे. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात तुरडाळ 130 रुपये किलो होती, तीचा दर 190 रुपये किलो झाला असल्याचे टीव्ही 9 मराठीने केलेल्या ‘रियाल्टी चेक’ मध्ये आढळले आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर दिवाळीचा फराळ कडू कडणारी बातमी आली आहे. या भाव वाढीमुळे सर्वसामान्य गृहीणीचे किचनचे बजेट कोलमडले आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व अन्नपदार्थाचे भाव 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. फराळाच्या वस्तूंसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव प्रचंड महागले आहेत. गेल्या दोन महिन्यांनी तुरडाळ आणि इतर डाळींचे भाव प्रचंड वाढले आहेत. फराळासाठी लागणारे साहित्य महागल्याने लोक रेडीमोड फराळाकडे ग्राहक वळत असतात. रेडीमेड फराळाचे दर गेल्या वर्षांच्या तुलनेत किलोमागे 100 ते 120 रुपयांनी महागले आहेत.

सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या

गेल्या दोन महिन्यात डाळी आणि कडधान्याचे दर वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी तूरडाळ किरकोळ बाजारात 130 रुपये किलो होती. आज ती 190 रुपये किलो आहे. चणाडाळ दोन महिन्यांपूर्वी 70 रुपये किलो होती, आज ती 100 रुपये किलो आहे. मुगडाळ दोन महिन्यांपूर्वी 90 रुपये होती आज ती 130 रुपये किलो होती. बेसन दोन महिन्यांपूर्वी 80 रुपये किलो होते, आता बेसनचा दर 120 रुपये किलो आहे. मैदा पूर्वी 40 रुपये किलो होता आज 60 रुपये किलो झाला आहे.

दोन महिन्यापूर्वी आणि आजचे दर खालीलप्रमाणे

– तूरडाळ – पूर्वी 130 रु. – आता 190 रु. किलो

– चणाडाळ – पूर्वी 70 रु. – आता 100 रु. किलो

– मुगदाळ – पूर्वी 90 रु. – आता 130 रु. किलो

– बेसन – पूर्वी 80 रु. – आता – 120 रु. किलो

– मैदा – पूर्वी 40 रु. – आता – 60 रू. किलो