नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी आहे. शेअर बाजारात (Share Market) येत्या काही दिवसांत या कंपनीच्या स्टॉकमधील गुंतवणुक त्यांना मालामाल करु शकते. गुंतवणूकदारांना 42 रुपयांचा हा शेअर अवघ्या 4 रुपयांत खरेदी करता येणार आहे. या कंपनीवर कोणतेही कर्ज नसल्याने (Debt Free) शेअरधारकांना लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अर्थात गुंतवणूकदारांना (Investors) या कंपनीची इंत्यभूत माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर सेबीकडे उपलब्ध आहे. त्याची माहिती घेतल्याशिवाय त्यांनी गुंतवणूक करु नये. या कंपनीची कामगिरी आणि शेअरचा चढउतार यावरुन त्यांना गुंतवणुकीचा निर्णय घेता येईल.
शेअरमध्ये तेजी
तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये (Tarapur Transformers Ltd Share) आज गुरुवारी, 20 एप्रिल रोजी 10 टक्के तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर इंट्रा डे व्यापारी सत्रात 4.15 रुपयांवर व्यापार करत होता. त्यापूर्वी बुधवारी या शेअर 20 टक्के अपर सर्किट लागले. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 6.50 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांक 2.85 रुपये आहे.
कंपनीचे काम काय
तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड ही कंपनी वीज ट्रान्सफॉर्मरची निर्मिती, दुरुस्ती आणि नुतनीकरणाचे कामे करत आहे. ही मायक्रो कॅप कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 8.09 कोटी रुपये आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात तिच्यावरील कर्ज फेडले आहे. सध्या ही कंपनी कर्जमुक्त आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत 34.75 टक्के सीजीआर आधारे चांगला लाभ पदरात पाडून घेतला आहे.
शेअरची स्थिती
कंपनीचा शेअर मे, 2010 मध्ये 42 रुपयांवर होता. त्यानंतर गेल्या 12 वर्षांत हा शेअर घसरुन थेट 4 रुपयांवर येऊन धडकला. या शेअरचा 52 आठवड्यातील निच्चांक 2.85 रुपये आहे. या शेअरमध्ये 90 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या एका वर्षांत हा शेअर 20 टक्के आणि यावर्षी या शेअरमध्ये 16 टक्के वार्षिक आधारावर घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत हा शेअर 8 टक्क्यांनी वधारला आहे.
10 वर्षात तुफान परतावा
या मल्टिबॅगर शेअरने पण गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला. या शेअरने 10 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. 10 वर्षात या शेअरने 16,000 टक्क्यांचा परतावा दिला. केआयई इंडस्ट्रीजच्या शेअरने (KEI Industries Share) कोणाला लखपती तर कोणाला कोरडपती केले. दहा वर्षांपूर्वी ज्यांनी गुंतवणूक करुन ती तशीच ठेवली, होल्ड केली. त्यांना आज मोठा फायदा झाला.
10 हजाराचे 16 लाख
एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 16 लाख रुपये झाले असते. हा शेअर गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने घौडदौड करत आहे. या दरम्यान या शेअरने 520 टक्क्यांची उसळी घेतली आहे. या वर्षात या शेअरमध्ये 19 टक्के तेजी आली आहे.
हा गुंतवणुकीचा कोणताही सल्ला नाही. ही केवळ स्टॉक आणि कंपनीच्या कामगिरी, सध्यस्थितीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा, कंपनीचा अभ्यास जरुर करावा. तसेच बाजारातील तज्ज्ञ, विश्लेषकांचा सल्ला घ्यावा.