नवी दिल्ली | 14 March 2024 : जर तुम्हाल विचारलं की तुम्ही किती महाग शूज वापरता तर, त्याचे उत्तर काय असेल? जास्तीत जास्त 10 हजार अथवा डोक्यावरुन पाणी 20 हजारांचे शूज. हो की नाही? पण प्रसिद्ध Shark Tank India मधील ही जज 20 लाखांचे शूज वापरते. शार्क टँक इंडिया या शोची चर्चा आहे. या शोमध्ये स्टार्टअप कंपनी नवनवीन कल्पना घेऊन येतात. शार्क डील मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करतात. शार्क टँकच्या जजेसमध्ये नमिता थापर नेहमी चर्चेत असते. तिची जीवनशैली एकदम आलिशान आहे. श्रीमंती जणू तिच्या पायाशी लोळण घेते. तिच्या सहकारी जजने ती 20 लाखांचे शूज वापरत असल्याचा दावा केला आहे. ती किती संपत्तीची मालकीण आहे?
20 लाखांचे शूज
नमिता ही यशस्वी उद्योजिका आहे. ती आंतरराष्ट्रीय कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची संचालक आहे. याशिवाय ती इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडची संस्थापक आणि सीईओ पण आहे. नमिता या कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. तिच्याकडे आलिशान बंगले आणि महागड्या कार सुद्धा आहे. तिचा सहकारी या शोमधील जज अमित जैन यांनी ती 20 लाख रुपयांचे शूज वापरत असल्याचे सांगितले. नमिताकडे अनेक आलिशान कारचे कलेक्शन आहे. तिच्याकडे 2 कोटी रुपयांची BMW X7, एक मर्सिडीज-बेंज GLE आणि ऑडी Q7 सारख्या महागड्या कार आहेत.
50 कोटींचा बंगला