या फूड डिलिव्हरी कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांना लॉटरी, आयपीओमुळे नशीब उघडलं

| Updated on: Nov 15, 2024 | 3:37 PM

या कंपनीच्या आयपीओला थंड प्रतिसाद मिळेल असे वाटतं होते. पण बाजारात या कंपनीने दमदार नाही पण चांगली एंट्री घेतली. या कंपनीने गुंतवणूकदारांसोबतच कर्मचाऱ्यांना सुद्धा कमाईची संधी दिली होती. त्याचा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फायदा झाला. कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन अंतर्गत त्यांना लॉटरी लागली.

या फूड डिलिव्हरी कंपनीच्या 500 कर्मचाऱ्यांना लॉटरी, आयपीओमुळे नशीब उघडलं
आयपीओमुळे मालामाल
Follow us on

Swiggy IPO : स्विगी कंपनीच्या आयपीओवर सध्या बाजारातील पडझडीचे संकट आहे. ग्रे मार्केटमध्ये पण स्विगीला थंड प्रतिसाद मिळत आहे. स्विगीच्या आयपीओ गुंतवणूकदारांना मालामाल करणार की नाही हे आताच सांगणं कठीण असलं तरी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मात्र चांदी झाली आहे. स्विगीचे एक, दोन नाही तर जवळपास 500 कर्मचारी करोडपती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन आणि जुन्या अशा 500 कर्मचाऱ्यांना कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर लॉटरी लागली. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीने कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) दिला आहे. त्यांचे नशीब थेट उघडले आहे. त्यांना शेअर लिस्टिंगाचा अजून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

आयपीओपेक्षा 7.7 टक्के अधिक

स्विगीचा आयपीओ NSE वर 7.7 टक्के प्रिमियम 420 रुपयांवर उघडला. स्विगीचा आयपीओ 3.59 पट सब्सक्राईब झाला. यामध्ये संस्थागत गुंतवणूकदारांची रूची दिसून आली. आता आयपीओ माध्यमातून मिळालेला निधी कंपनी विस्तार योजना, तंत्रज्ञान आणि विपणन, मार्केटिंगसाठी वापरणार आहे. बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात कंपनीने चांगली एंट्री घेतली. सध्या बाजारातील घडामोडींचा परिणाम दिसून आला. एनएसईवर स्विगीचा आयपीओ 420 रुपयांवर सूचीबद्ध झाला तर इश्यू प्राईस 390 रुपये होती. तर बीएसईवर तो 412 रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओच्या किंमतीपेक्षा हे प्रमाण 5.64 टक्के अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

तीन दिवसांच्या बोलीनंतर स्विगीचा आयपीओ मजबूत मागणीसह बंद झाला. त्याला 3.59 पट बोली लागली. 16 कोटींच्या शेअरच्या तुलनेत 57.53 कोटी शेअरच्या बोली लागल्या. या आयपीओत 1.65 पट कर्मचारी कोटा बुक करण्यात आला. हा आयपीओ 11,327.43 कोटी रुपयांचा होता. 6 ते 8 नोव्हेंबरपर्यंत तो सब्सक्रिप्शनसाठी उघडा होता. फूड प्लॅटफॉर्म ते क्विक कॉमर्स कंपनीने शेअरची किंमत 371-390 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती.

स्विगीचे कर्मचारी करोडपती

कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन अंतर्गत कंपनीने कर्मचाऱ्यांना शेअर खरेदीची संधी दिली होती. कर्मचाऱ्यांना कंपनीशी जोडून त्यांना नफ्यात भागीदार करणे हा ईएसओपीचा उद्देश आहे. कंपनी कर्मचाऱ्यांना काही ठराविक स्टॉक कमी किंमतीत अथवा विनाशुल्क खरेदीची संधी देतात. त्यानुसार कंपनीने कर्मचाऱ्यांना ही संधी दिली. त्याचा त्यांना फायदा झाला.