नवी दिल्ली | 14 February 2024 : पेन्शन, निवृत्ती हा शब्द आयुष्याची संध्याकाळ आनंदाने घालविण्यासाठी आधार ठरतो. निवृत्तीनंतर आर्थिक हातभार लावण्यासाठी पेन्शन उपयोगी ठरते. त्यामुळे आतापासून तुम्ही जर उतारवयासाठी योग्य आर्थिक तरतूद केली तर तुम्हाला आर्थिक खर्चाचा ताण येत नाही. मुलांवरील अवलंबित्व पण कमी होते. पेन्शन हे दरमहा उत्पन्नाचे साधन ठरते. जर तुम्ही तरुण असाल तर प्रत्येक महिन्याला एक छोटी रक्कम पेन्शन योजनेत गुंतवल्यास उतारवयात मोठा फायदा मिळतो. सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana-APY) त्यामुळेच लोकप्रिय ठरली आहे.
5000 रुपयांपर्यंत हमखास पेन्शन
उतारवयात आर्थिक स्वांतत्र्य असेल तर त्यापेक्षा आनंदाची बातमी काय असेल, नाही का? त्यामुळेच अटल पेन्शन योजनेतील गुंतवणूक फायद्याचा सौदा ठरेल. या योजनेत केंद्र सरकार पेन्शनची हमी देते. या योजनेसाठी तुम्ही प्रत्येक दिवशी एक छोटी रक्कम बाजूला काढल्यास आणि योजनेनुसार गुंतवल्यास 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. म्हणजे निवृत्तीनंतर तुमचे नियमीत उत्पन्न पक्के आहे. APY मध्ये गुंतवणुकीसाठी 18 ते 40 अशी वयोमर्यादा आहे.
20 वर्षे करावी लागेल गुंतवणूक
अटल पेन्शन योजनेत पेन्शन मिळविण्यासाठी कमीत कमी 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते. जर तुम्ही 40 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक सुरु केली तर 60 व्या वर्षांपर्यंत तुम्हाला या योजनेत गुंतवणूक सुरु ठेवावी लागेल. APY मधील गुंतवणुकीवर हमखास पेन्शनच मिळते असे नाही तर इतर पण अनेक फायदे मिळतात. यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचविता येतो. कराचा हा फायदा गुंतवणूकदारांना आयकर कलम 80C अंतर्गत मिळतो. पण जे आयकर भरतात, अशा करदात्यांना या योजनेतून कराचा फायदा घेता येत नाही.
किती करावी लागते गुंतवणूक
60 वर्षांपूर्वीच लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास
लाभार्थी 60 वर्षांपूर्वी मयत झाला तर त्याच्या साथीदाराला, वारसाला पेन्शन मिळते. जोडीदाराचा पण मृत्यू ओढावल्यास त्याच्या वारसदारांना एकरक्कमी लाभ मिळतो. या योजनेची सुरुवात आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये झाली होती.