नवी दिल्ली : सणासुदीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Government) एकामागून एक सूखद धक्के बसत आहे. केंद्र सरकारने नुकतंच कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता (DA) देण्याचे आश्वासन केंद्र सरकारने पूर्ण केले. आता सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक दिवाळी भेट (Diwali Gift) देण्याच्या तयारीत आहे.
तर हे दुसरं गिफ्ट आहे HRA चं. अर्थात केंद्र सरकार हाऊस रेंट अलाऊंसमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहे. तसेच असा नियम पण आहे की, महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर एचआरएमध्ये वाढ करण्यात येते. एचआरएत वाढ झाल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
याविषयीच्या एका अहवालानुसार, केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांचा HRA वाढवू शकते. एकदा HRA वाढला की, कर्मचाऱ्यांचा पगार आपोआप वाढेल. कॅबिनेटने महागाई भत्त्याचा निर्णय घेतला तसाच केंद्र सरकार HRA चा निर्णय लवकरच घेईल.
यापूर्वी केंद्र सरकारने 2021 साली HRA मध्ये वाढ केली होती. त्याचवर्षी सरकारने महागाई भत्त्यात वाढ करत तो 28 टक्के केला होता. या महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्ता 34 टक्क्यांहून 38 टक्के केला आहे. त्यामुळे HRA मध्ये वाढ होण्याची शक्यता वाढली आहे.
2017 मध्ये सरकारने HRA मध्ये वाढीचे काही नियम स्पष्ट केले होते. त्यानुसार, महागाई भत्ता 25 टक्क्यांपेक्षा जास्त गेला तर HRA मध्ये सुधारणा केल्या जाते. HRA हा शहरी भागानुसार विभागल्या जातो.
मेट्रो शहरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 ते 5 टक्के तर निम्न शहरात 2 टक्के तर इतर शहरात 1 टक्के HRA वाढवण्यात येईल. त्या त्या विभागातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यानुसार, HRA वाढवण्यात येईल.