मुंबई : पंतसंस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार आता जर एखाद्या व्यक्तीला सहकारी पतसंस्थेचे संचालक व्हायचे असेल तर संबंधित व्यक्तीला त्या पतसंस्थेमध्ये एक ठारावीक रक्कम मुदत ठेव (Fixed deposit) म्हणून ठेवावी लागणार आहे. अनेक जण हे पंतसंस्थेचे नाममात्र सदस्य असतात, त्यांचा पंतसंस्थेच्या कामाशी काहीही संबंध नसतो. मात्र असे सदस्य (Members)देखील निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरतात. त्यामुळे आता अशा उमेदवारांना आळा घालण्यासाठी सहकार विभागाकडून फिक्स डिपॉझिटची अट घालण्यात आली आहे. जर तुमचे संबंधित संस्थेमध्ये फिक्स डिपॉझिट असेल तरच तुम्हाला निवडणूक लढवता येणार आहे. याबाबत सहकार आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्यातील सर्वच पतसंस्थांनी आपल्या उपविधीत याबाबतची दुरुस्ती करावी असेही सहकार आयुक्तांनी म्हटले आहे.
अनेक जण पंतसंस्थेमध्ये कोणतीही ठेव ठेवली नसताना, तसेच पंतसंस्थेच्या कामाशी काहीही संबंध नसताना निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र आता अशा गोष्टींना चाप बसणार आहे. यासाठी सहकार विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार जर कोणालाही पतसंस्थेची निवडणूक लढवायची असेल तर त्याला आधी संबंधित पतसंस्थेमध्ये एक ठराविक रक्कम मुदत ठेव (फिक्स डिपॉझिट) ठेवावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला निवडणुकीला उभे राहाता येईल. याबाबत सहकार आयुक्तांकडून आदेश देण्यात आले आहेत. तसेच राज्यातील सर्वच पतसंस्थांनी आपल्या उपविधीत याबाबतची दुरुस्ती करावी असेही सहकार आयुक्तांनी म्हटले आहे.
अनेक जण पंतसंस्थेच्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी त्यांचे त्या पतसंस्थेमध्ये जे बचत खाते असते, त्यावर ठरावीक रक्कम टाकतात. व हीच रक्कम मुदत ठेव असल्याचे दाखवत उमेदवारी अर्ज भरतात. उमेदवारी अर्ज स्विकारल्यानंतर ती रक्कम उमेदवार परत काढून घेतात. याची देखील सहकार आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून, बचत खात्यावरील रक्कम म्हणजे मुदत ठेव नव्हे असे स्पष्ट करण्यात आले आहे.