नवी मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : टोमॅटोच्या टंचाईने सगळ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही जण टोमॅटोचा भाव वाढल्याने अनेकांच्या जेवणातून टोमॅटो गायब झाले आहेत. तर काही सेलिब्रिटींनी टोमॅटोच्या महागाईवर तोंडसुख घेतल्याने शेतकरी नेत्यांनी त्यांची शाब्दीक धुलाई केली आहे. काही शेतकऱ्यांच्या घरी टोमॅटोच्या पिकामुळे समृद्धी आली आहे. तर काहींनी टोमॅटो पिकांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्हींचा पहारा लावला आहे. अशा टोमॅटोच्या झळ श्रीमंतापासून गरीबांना बसत असताना. आता मोबाईलवर टोमॅटो फ्री सारख्या योजनाही आल्या आहेत. असे असताना आता मतदार राजाला राजकीय लोकही टोमॅटो स्वस्त देऊन भुलवित आहेत.
लहरी हवामान आणि उत्तरेकडील राज्यात झालेली अतिवृष्टी आदीमुळे टोमॅटोच्या उत्पनात झाली घट यामुळे टोमॅटोची टंचाई निर्माण झाली आहे. दिल्ली आणि उत्तरेकडील राज्यात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचे पिक संजीवणी ठरले आहे. तर या टोमॅटोच्या टंचाईचा राजकीय लोकांनी फायदा न घेतला तर नवलच. आता राजकीय लोकांनीही टोमॅटोची लालूच दाखवत आपले मतदार पक्के करण्यासाठी त्याचा वापर केला आहे.
घरोघरी टोमॅटोची विक्री
नवीमुंबई जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक किशोर अशोक पाटकर यांच्यावतीने नवी मुंबईत घरोघरी स्वस्तात टोमॅटो विक्री करण्यात आली आहे. माजी नगरसेवक किशोर पाटकर यांच्या कार्यकर्त्यांनी नवीमुंबईतील वाशी सेक्टर 10 येथील रहिवाशांना 20 रुपये किलो दराने टोमॅटो पुरविले आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात टोमॅटो 50 चे 60 रुपये किलो दराने मिळत असताना या नगरसेवकाने 20 रुपये किलो दराने 31 जुलै रोजी घरोघरी टोमॅटो पुरविले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे.