मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : आजकाल काम आणि आराम यातील सीमारेषा धुसर होत चालली आहे. कोरोना लॉकडाऊननंतर अनेक कार्यालयातील कामकाज वर्क फ्रॉम होम सुरु करण्यात आले. ज्यांना लोकांना काम करताना फ्लेक्सिबल आणि रिलॅक्स वातावरणाची गरज आहे अशा लोकांसाठी नवीन संकल्पना येत आहेत. एक वॉल म्युरल आर्टीस्ट आणि एओएम स्टुडिओजचे को-फाऊंडर असलेल्या अतिरा मोहन यांनी नवीन कन्सेप्टवर आधारित ‘जीव्हीक्यू टाईम कॅफे’ उभारले आहे. या अनोख्या कॅफेची कन्सेप्ट अशी आहे की तुमच्याकडून जेवणाचं बिल नाही तर वेळेचं बिल वसुल केले जाणार आहे.
अतिरा मोहन यांचे हे अनोखे कॅफे रशियाच्या ‘एण्टी-कॅफे’ या थीमवर आधारित आहे. येथे कॅफेमधील लोक त्यांनी येथे व्यतित केलेल्या प्रत्येक मिनिटांचे पैसे देतील आणि येथे हवे तेवढे जेवण आणि ड्रीक्स घेऊ शकतील. अतिरा मोहन यांच्या व्यक्तीगक अनुभव आणि नव्या विचाराने केरळ राज्यातील कोच्ची शहरात अशा प्रकारचे एक कॅफे सुरु झाले आहे. हे कॅफे ग्राहकांना त्यांचा टाईम मॅनेजमेंट करायला, वेळ घालवायला आणि फ्लेक्झिबिलिटी एन्जॉय करायला देते.
GVQ TIME CAFE –
कोविड – 19 च्या जागतिक साथीत सर्व जग थांबले होते. त्यावेळी सर्वसामान्यांसह गरीब असो वा श्रीमंत सर्वांसमोर अनेक आव्हानं आणि प्रश्नं निर्माण झाले होते. खास करुन कला आणि फॅशनसारख्या लक्झरी व्यवसायासमोरही नवा आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी अतिरा मोहन या म्युरल आर्टीस्ट असलेल्या महिला कलाकारादेखील आर्थिक अडचणीत सापडली. तिने संकटातून तरण्याचा नवा मार्ग शोधण्यासाठी सुरुवात केली. तिची नेहमीच कॅफे उघडण्याचे स्वप्न होते. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुरुवात म्हणून तिने साल 2020 मध्ये संशोधन सुरु केले. तिने कोच्ची आणि आजूबाजूच्या अनेक कॅफेंचा दौरा केला. तेथे भूक नसतानाही तिला जेवण ऑर्डर करावे लागले. ही गोष्ट तिला योग्य वाटत नव्हती. त्यानंतर यातू तिला ‘टाइम कॅफे’ ची आयडीया सुचली. तिने तिच्या जुन्या घराचे रुपांतर कॅफेत करुन टाकले.
जीव्हीक्यू टाइम कॅफेचे ध्यैय ग्राहकांना जेवण ऑर्डर करण्यासाठी दबाव टाकण्याऐवजी कॅफे घालवलेल्या वेळेची फी घेणे आहे. ग्राहक येथे बाहेरूनही जेवण ऑर्डर करु शकतात. येथील लिमिटेड इन-हाऊस मेन्यूतून निवड करू शकतात. ज्यात ऑम्लेट, सँडविच आणि इतर खूप सारे पदार्थ आहेत. ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी आणि कोल्ड कॉफी असे ड्रींक सुद्धा येथे उपलब्ध आहेत. ग्राहकांना कुकीज आणि कॅफेचा सिग्नेचर स्वीट बटर क्रेप देखील मिळतो. या कॅफेत पहिल्या तासासाठी प्रति व्यक्ती 150 रुपये आकारले जातात. नंतरच्या तासांसाठी रुपये 1 प्रति मिनिट शुल्क आकारले जाते. येथे ग्राहक आराम करु शकतात, काम किंवा पोटपुजा आपल्या पद्धतीने करु शकतात. ही आगळीवेगळी संकल्पना लोकांना आवडते. जीव्हीक्यू टाइम कॅफेचे कन्सेप्ट दुसऱ्या शहरातही आणण्याची अतिरा यांची योजना आहे.