नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) पाठोपाठ फेसबुकच्या (Facebook) कर्मचाऱ्यांवरही (Employees) कपातीची कुऱ्हाड कोसळलीच. कोणत्याही टेक कंपनीने घेतला नसेल असा हादरवणारा निर्णय फेसबुकने घेतला आहे. कंपनीने 11000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यामुळे सोशल मीडिया (Social Media) जगतात एकच खळबळ उडाली आहे.
फेसबुकच्या अंतर्गत निर्णयाचा हा परिपाक मानण्यात येत आहे. एकाच दिवशी एवढ्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविणाऱ्या फेसबुकने हा निर्णय एकाच दिवशी घेतला नाही. त्यामागे मोठी पार्श्वभूमी आहे.
तज्ज्ञांच्या मते अतिउत्साह आणि चुकीचे निर्णय यामुळे फेसबूक गंटागळ्या खात आहे. त्यांचे अनेक निर्णय आत्मघातकी ठरले. या चुकीच्या निर्णयामुळेच फेसबुक संकटात सापडले आहे. त्याविषयीची माहिती पाहुयात..
मंगळवारी फेसबुकची एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग खूप निराश होते. ही जी कर्मचारी कपात होत आहे. त्याला मीच जबाबदार असल्याचा दावा झुकरबर्गने केला.
कंपनी झपाट्याने प्रगती करेल, या आशेवर अनेक लोकांना कामावर घेण्यात आले. पण हा निर्णय आत्मघातकी ठरला. कंपनीने 11000 कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ केला. या कर्मचाऱ्यांना एका फटक्यात रस्त्यावर आणले.
मेटा हा प्रकल्प सुरु करताना, तो यशस्वी होण्यासाठी कमीत कमी 10 वर्षे लागतील, असे संकेत झुकरबर्गने दिले होते. आता कर्मचारी कपातीनंतर नवीन कर्मचारी भरतीवर बंधन आली आहेत. तसेच खर्च कपातीवर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.
जाहिरातीतून मोठी कमाई होईल, महसूल प्राप्त होईल, ही आशा फोलच ठरली. या आघाडीवर फेसबुकला मोठा झटका बसला. त्यामुळे संकटात सापडलेल्या फेसबुकसमोर कर्मचारी कपातीशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
बिझनेस इनसाईडर च्या सप्टेंबर महिन्यातील अहवालानंतर कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. 15 कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे मूल्य 1 खरबवरुन घसरुन 270 अरब डॉलर झाले. त्यामुळे खर्च वाचविण्यावर भर देण्यात आला.
मेटवर्स सुरु केल्यापासूनच फेसबुकला संकटाची चाहुल लागली होती. मेटाचा शेअर यावर्षातच 72 टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकन शेअर बाजारात मेटाची कामगिरी सर्वात नीच्चांकी ठरली आहे. मेटाच्या शेअरमध्ये वर्षभरात 67 अरब डॉलरची घसरण झाली आहे.