नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीदारांना मोठी पर्वणी मिळाली आहे. मे महिन्यात सोने-चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. सोन्याने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी सोने 65,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता मावळली आहे. चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा गाठला होता. पण त्यापुढे चांदीला मजल मारता आलेली नाही. आठवडाभरात सोने एक हजाराने तर चांदी जवळपास 4 हजार रुपयांनी गडगडली. खरेदीदारांना स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे. अमेरिकन डॉलरचा दबाव असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीचे भाव नरमले आहे.
आठवड्यात एक हजारांची घसरण
10 मे रोजी 22 कॅरेट सोने 57,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर 24 कॅरेट सोने 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मध्यंतरी दोनदा भावात 100,150 रुपयांची वाढ झाली. पण आठवडाभरात सोन्यात एक हजारांची घसरण दिसून आली. 18 मे रोजी 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेटचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 19 मे रोजी सकाळच्या सत्रात भावात कोणताच बदल दिसून आला नाही. गुडरिटर्न्सने जाहीर केलेल्या किंमतीनुसार हे भाव आहेत.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,474 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,232 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,394 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,356 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
चांदीची घसरगुंडी
ibjarates.com नुसार, आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. 18 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 71,808 रुपये होता. 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. एक किलो चांदीचा भाव 15 मे रोजी 72,455 रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण कायम आहे. चांदीत जवळपास चार हजारांची घसरण झाली.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.