नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : आता अवघ्या काही तासात भारत त्याच्या नावावर विश्वविक्रम कोरण्याच्या तयारीत आहे. जगातील बलाढ्य देशांना जे जमले नाही, ते भारतीय अवकाश संशोधन संस्था, इस्त्रो (ISRO) करुन दाखवणार आहे. भारतीय चंद्रयान- 3 (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणार आहे. भारताच्या या कामगिरीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. यशाला गवसणी घातली तर भारत इतिहास रचेलच पण भारतीय अर्थव्यवस्थेला आणि इस्त्रोसाठी कायमस्वरुपी आर्थिक स्त्रोत उपलब्ध होऊ शकतो. चंद्राच्या साक्षीने भारत Moon Economy मध्ये पाऊल टाकेल. असा करणार तो या पृथ्वीतलावरील एकमेव देश ठरेल. या प्रयोगाच्या यशाने भारताच्या हातात सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागलीच म्हणून समजा.
तर हजार अब्ज अर्थव्यवस्था
चंद्रयान (Chandrayaan 3 Landing) मोहिम यशस्वी झाली तर भारताला मोठा फायदा होईल. यामुळे आंतराळात भारताचा दबदबा वाढले. भारत चंद्रानंतर मंगळासाठी पण सज्ज झाला आहे. चंद्र मोहिमेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल. भारतीय अर्थव्यवस्था हजार अब्जांपेक्षा(One Trillion) अधिक होण्यास मोठी मदत मिळेल. त्यामुळेच हे मिशन भारतासाठी महत्वाचे आहे.
हाती लागेल खजिना
2040 पर्यंत मून इकॉनॉमी, चंद्राची अर्थव्यवस्था उदयास येईल. त्यामाध्यमातून मोठी कमाई साधता येईल. जवळपास 4200 कोटींची कमाई होण्याचा अंदाज आहे. चंद्रापर्यंत जाण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवस्था झालेली असेल. त्यामाध्यमातून नियमीत कालावधीत यान ये-जा करतील. ही दळणवळण व्यवस्था 42 अब्ज डॉलरवर पोहचेल.
इतक्या अंतराळवीरांची वसाहत
2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत, 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील. त्यांची चंद्रावर वसाहत असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवात जसे संशोधन सुरु आहे. तसेच संशोधन प्रकल्प तिथे सुरु होतील. मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाणी गवसल्यास मोठा फायदा होईल.
भारतासाठी मोठी संधी
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कोणीच उतरु शकले नाही. भारताने सॉफ्ट लँडिंगचा इतिहास केला तर भारत असा करणारा पहिला देश ठरेल. अमेरिका, रशिया आणि चीनने यापूर्वी चंद्रावर स्वारी केली आहे. पण दक्षिण ध्रुवावर त्यांना मजल मारता आलेली नाही. रशियाचा आताचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे भारताला मोठी संधी आहे.
संशोधनाचा मोठा फायदा
सॉफ्ट लँडिंग झाल्यास भारत चंद्रावर संशोधन करेल. त्यामाध्यमातून ऑक्सिजन निर्मितीसाठी आवश्यक काय स्थिती चंद्रावर उपलब्ध आहे, ते समजेल. पाण्याचा काही पुरावा मिळाल्यास अथवा ते तयार करण्याचे काही साधन उपलब्ध झाल्यास हा डेटा भारतासाठीच नाही तर जगासाठी फायदाचा ठरेल. त्याआधारे संशोधकांना चंद्रावर पाठविण्यात येऊ शकते.