अयोध्या | 18 जानेवारी 2024 : अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिष्ठापना जसजशी जवळ येत चालली आहे. तसतशी अयोध्यानगरीत भक्तांच्या सोबतच आता उद्योगांची देखील लगबग सुरु झाली आहे. मोठ मोठ्या कंपन्यांना या सोहळ्यानंतर अयोध्यानगरीत सुरु होणाऱ्या विकास कामात मोठी गुंतवणूक संधी दिसू लागली आहे. केवळ 3.5 लाख लोकसंख्येचे हे शहर राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सजले आहे. राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले झाल्यानंतर सुमारे दहा लाख भक्त येथे पोहचण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिकांना येथे मोठी व्यवसायाची संधी दिसत आहे.
डाबर ग्रुपने आपला पॉप्युलर ब्रॅंड ‘हाजमोला’ ला प्रमोट करण्यासाठी अनोखी रणनीती आखली आहे. 22 डिसेंबर 2024 च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची जेथे जेवणाची आणि भंडाऱ्याची व्यवस्था असेल तेथे हाजमोला कंपनी आपले प्रोडक्ट मोफत वाटणार आहे. तसेच हाजमोला कंपनी अयोध्येतील तुलसी उद्यानात एक एक्सपीरियंस सेंटर तयार करीत आहे. येथे डाबर कंपनीचे अन्य उत्पादने उदा. ऑईल, हर्बल टी, रियल ज्यूस आदींचा वापर करु शकणार आहेत. डाबरने लखनऊ, वाराणसी आणि गोरखपुरहून अयोध्या येणाऱ्या महामार्गावर असणाऱ्या ढाब्यांशी देखील करार केला आहे. कंपनी येथे आपले नाव झळकून जाहीरात व्हावी यासाठी बिलबोर्डपासून शेल्फला नवीन ब्रॅंडींग करीत आहे.
कोकाकोला कंपनीने देखील राम मंदिराची थीम लॉंच केली आहे. आतापर्यंत कोकाकोला आपल्या ब्रॅंडींगसाठी नेहमी लाल रंगाचा वापर करीत होती. परंतू आता कंपनी ब्राऊन रंगाचा थीमसाठी वापर केला आहे. राम मंदिराला जाणाऱ्या मार्गांवर कंपनीने 50 हून अधिक वेंडींग मशिन लावल्या आहेत. आणखी 50 वेंडींग मशिन लावण्यासाठी तयारी सुरु आहे. अयोध्येतील दुकानात नवीन बिलबोर्ड आणि कुलर्सलाही बाजारात कंपनीने उतरविले आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंज्युमर प्रोडक्ट्स लि. आणि गौतम अदानी यांच्या फॉर्च्युन ब्रॅंडने यांनी देखील अयोध्येत ब्रॅंडींगची जोरदार तयारी केली आहे. रियालन्सने आपल्या कॅंपाकोला ब्रॅंडची मार्केटींग केले आहे. तसेच इंडिपेंडेंस ब्रॅंडला देखील कंपनी प्रमोट करणार आहे. अदानी विल्मर आपल्या फॉर्च्युन ब्रॅंडचे प्रोडक्टचे ब्रॅंडींग करणार आहे. राम मंदिरच्या प्रसादाच्या सॅंपलद्वारे आपले प्रोडक्टला प्रमोट करीत आहे. आयटीसी मंगलदीप अगरबत्तीचीही अयोध्येत जाहीरात करीत आहे. कंपन्यांनी केवळ जाहीराती न करता आपले कियोस्क देखील जागोजागी बसवित आहे. याशिवाय कंपन्यांनी शरयू किनारी चेंजिंग रुम देखील तयार केले आहे.