संकटानंतरही अदानी एनर्जीमध्ये धुमशान; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

| Updated on: Dec 12, 2024 | 5:16 PM

Adani Green Energy Stock : अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर गुरुवारी व्यापारी सत्रात जोरदार उसळला. कंपनीचा शेअर आज 8 टक्क्यांनी वधारला. आज इंट्रा डेवर हा शेअर 1248.90 रुपयांवर पोहचला. संकटातही या शेअरने जोरदार कामगिरी बजावली.

संकटानंतरही अदानी एनर्जीमध्ये धुमशान; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
अदानी ग्रीन एनर्जी
Follow us on

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा शेअर गुरुवारी व्यापारी सत्रात उसळला. कंपनीचा शेअर आज 8 टक्क्यांहून अधिकने वधारला. इंट्रा डेमध्ये हा शेअर 1248.90 रुपयांवर पोहचला. या तेजीमागे एक मोठे कारण आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात 250 मेगावॅटचा सोलर एनर्जी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. त्यानंतर अदानी कंपनीचा शेअर बाजारात जोरदार धावला. हा स्टॉक खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. अमेरिकेत कंपनीवर खटला गुदरला आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टात अमेरिकन एजन्सींनी कंपनीवर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. कंपनीने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यानंतर आता या शेअरमध्ये आज तेजीचे सत्र दिसले.

250 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचा श्रीगणेशा

बीएसईला दिलेल्या सूचनेनुसार, राजस्थानमधल जोधपूर येथे कंपनीने 250 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. हा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा कंपनीने केली. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची राजस्थानमधील साहाय्यक कंपनी अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फाईव्ह लिमिटेडने हा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातील उत्पादनासह आता अदानी समूहाच्या अक्षय ऊर्जा उत्पादनाची क्षमता वाढून 11,434 मेगावॅट इतकी झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरची कामगिरी

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरला गेल्या काही दिवसांत जोरदार कामगिरी बजावता आली नाही. महिनाभरात यामध्ये 8 टक्के तर सहा महिन्यात 35 टक्क्यांची जोरदार घसरण दिसली. आतापर्यंत हा शेअर 24 टक्क्यांनी तर वर्षभराचा आलेख पाहता 16 टक्क्यांनी दणकावून आपटला. पाच वर्षांचा विचार करता या शेअरने जवळपास 900 टक्क्यांचा रिटर्न दिला. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 2,173.65 रुपये तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 870.90 रुपये इतकी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 1,93,053.96 कोटी रुपये आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.