Gautam Adani | हिंडनबर्गचे ढग निवळले, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र

| Updated on: Jan 03, 2024 | 2:27 PM

Gautam Adani Hindenburg | अदानी समूहावर हिंडनबर्गच्या आरोपांचे बालंट येऊन आता एक वर्ष होत आले आहे. गेल्या वर्षी 23 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्गच्या आरोपांचा बॉम्ब फुटला होता. याप्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. याप्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्यास नकार दिला. या दिलासाचे पडसाद शेअर बाजारात दिसून आले.

Gautam Adani | हिंडनबर्गचे ढग निवळले, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजीचे सत्र
Follow us on

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : अदानी समूहाच्या स्टॉकमध्ये बुधवारी जोरदार रॅली दिसून आली. बाजारात अदानी समूहाच्या शेअरमध्ये इन्ट्राडेमध्ये 3 ते 18 टक्क्यांची तेजी दिसून आली. या तेजीच्या सत्रामुळे 3 जानेवारी रोजी संपूर्ण समूहाचे भागभांडवल 15 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले. आज सर्वोच्च न्यायालयात अदानी समूह-हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणात सुनावणी झाली. अदानी समूहाने शेअरच्या किंमती फुगवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्रकरणात बाजार नियंत्रक सेबी तपास करत आहेत. तर याचिकेत सीबीआय अथवा एसआयटीद्वारे तपास करण्याची विनंती करण्यात आली होती. सेबीच्या तपासात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. बाजारात लागलीच अदानी समूहाचे शेअर उसळले.

या शेअरमध्ये तेजीचे सत्र

  • अदानी यांची फ्लॅगशीप कंपनी अदानी एंटरप्रायजेसच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची उसळी आली.
  • अदानी पोर्ट्सच्या शेअर 6 टक्क्यांनी वधारला. तो 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 1,144 रुपयांवर पोहचला
  • अदानी एनर्जी सोल्यूशन्सचा शेअरने 18 टक्क्यांची उडी घेतली
  • अदानी पॉवरचा शेअर 5 टक्क्यांनी वधारुन 544.65 रुपयांवर पोहचला
  • अदानी टोटल गॅसमध्ये 10 टक्क्यांची उसळी दिसली
  • अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी विल्मरने 9 टक्क्यांची तेजी आली
  • तर एनडीटीव्हीचा शेअर जवळपास 11 टक्क्यांची झेप घेतली
  • अंबुजा सिमेंट 3 टक्क्यांनी वधारुन तो 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर 549 रुपयांवर पोहचला

काय म्हटले निकालात

हे सुद्धा वाचा
  • OCCPR च्या अहवालाआधारे SEBI च्या तपासावर संशय व्यक्त करता येत नाही
  • सर्वोच्च न्यायालयाने इतर दोन प्रकरणांचा तीन महिन्यात तपासाचे निर्देश दिले
  • सेबीने याप्रकरणात 24 तपासांपैकी 22 तपासांचा अहवाल सादर केला
  • तर दोन अंतरिम रिपोर्ट अगोदरच मांडले आहेत
  • कोर्टाने हे प्रकरण विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यास नकार दिला
  • सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे, सीबीआयकडे सोपविण्यास नकार दिला
  • या निकालाचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवर दिसून आला

ही होती याचिका

गौतम अदानी आणि अदानी समूहाविरोधात जानेवारी 2023 मध्ये आरोपांची राळ उडाली होती. अमेरिकेची शॉर्टसेलर संस्था हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर अनियमिततेचे आरोप केले होते. अदानी समूहाने शेअरच्या किंमती फुगवल्याचा प्रमुख आरोप होता. प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती.