Milk Price Hike : अमूलनंतर आता Mother Dairy चाही ग्राहकांना झटका, दूध महागलं.. आजपासून एवढे वाढले रेट

| Updated on: Jun 03, 2024 | 1:54 PM

Milk Price Hike : दोन दिवसांतच दोन मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या दुधाच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. रविवारी अमूल दूध कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली. तर आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी, सोमवारी Mother Dairy नेही सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे.

Milk Price Hike : अमूलनंतर आता Mother Dairy चाही ग्राहकांना झटका, दूध महागलं.. आजपासून एवढे वाढले रेट
Follow us on

लोकसभा निवडणुकांचं मतदान संपताच सर्वसामान्य जनेतला झटका बसणारे निर्णय जाहीर होत आहेत. एकीकडे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने देशभरात टोल टॅक्स वाढवला आहे. त्यामुळे हायवेरील प्रवास महागला आहे. तर दुसरीकडे अमूल कंपनीने दुधाच्या किमती वाढ केली आहे. हा झटका सहन होतो न होतो तोच आता Mother Dairyनेही यामध्ये उडी मारल आहे. रविवारी अमूल दूध कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली. तर आता त्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेज आज, सोमवारी Mother Dairy नेही सर्वसामान्य जनतेला झटका दिला. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांतच सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके पुन्हा बसायला सुरूवात झाली आहे.

मदर डेअरीने दिल्ली- एनसीआर (Delhi-NCR) साठी दुधाच्या दरात वाढ केली आहे. सर्व पॅकेज्ड दुधाच्या किमतीमध्ये दर लिटरमागे 2 रुपयांनी भाववाढ करण्यात आली आहे. दुधाच्या या नव्या किमती 3 जून 2024 (आजपासूनच) लागू करण्यात आल्या आहेत.

मदर डेअरी दुधाचे दर (3 जून पासून प्रभावी)

दूध             पूर्वीचा दर     नवा दर

Token Milk  52 रुपये 54 रुपये

Toned Milk   54 रुपये 56 रुपये

Cow Milk       56 रुपये 58 रुपये

Full Cream Milk   66 रुपये   68 रुपये

Buffalo Milk   70 रुपये 72 रुपये

Double Toned Milk   48 रुपये 50 रुपये

अमूलनेही वाढवले दर

यापूर्वी रविवारी अमूल कंपनीने दुधाच्या किमीत वाढवल्या होत्या. कंपनीने देशभरात 2 जूनपासून अमूल (Amul) दुधाच्या दरात प्रती लिटरमागे प्रत्येकी 2 रूपयांनी वाढ केली होती. अमूल गोल्ड, अमूल शक्ति, अमूल टी स्पेशल दुधाचे भाव वाढवण्यात आले. दुधाच्या किमतीमध्ये 3-4 टक्के वाढ करण्यात आली आहे. ताज्या बदलांनुसार आता

अमूल गोल्ड चा दर  64 रुपयांवरून  66 रुपये प्रतीलिटर झाला. तर अमूल टी स्पेशलचा दर 62 रुपयांवरून 64 रुपये प्रतिलीटर झाला आहे.

यापूर्वी एप्रिल 2023 मध्येही अमूल (Amul) ने गुजरातमध्ये दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) राज्यभरात अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली. नुकत्याच झालेल्या किमतींबाबत अमूलने म्हटले की, दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे हे दर वाढवण्यात आले आहेत.