नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाने (Crude Oil Price) जागीच उडी घेतली आहे. भावात किंचित वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरात आज पेट्रोल-डिझेल महागले. राज्यात परभणीकरांच्या खिशावर ताण आला आहे. परभणीनंतर नांदेड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कच्चा तेलाने दिमाख दाखविला. मार्चच्या तिमाहीत पेट्रोलियम कंपन्यांनी कधी नव्हे तो फायदा नोंदविला. या कंपन्या फायद्यात राहिल्या. कित्येक वर्षांपासून या कंपन्या तोटा झाल्याची सातत्याने ओरड करत होत्या. मध्यंतरी केंद्र शासनाने या तेल कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई दिली होती. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) काय
या ठिकाणी महागडे इंधन
आज सकाळीच पेट्रोलियम कंपन्यांनी भाव जाहीर केले आहे. त्यानुसार, राज्यात परभणीत सर्वाधिक महाग इंधन आहे. येथे पेट्रोल109.47 रुपये तर डिझेल 95.86 रुपये लिटर आहे. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 रुपये तर डिझेल 94.78 रुपये लिटर आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल108.01 रुपये तर डिझेल 94.48 रुपये लिटर आहे.
कच्चे तेल वधारले
आज 25 एप्रिल रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत फार मोठा उलटफेर झाला नाही. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 79.01 डॉलर प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 82.98 डॉलर प्रति बॅरलवर होते.
इराककडून आवक
रशिया पाठोपाठ आता इराण भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. त्यामुळे प्रत्येक बॅरलमागे दोन रुपयांची बजत होत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)
भाव एका SMS वर