दिल्ली : शिर्डीतील साई मंदिरातील फुलांना पाहून एका तरूणाला भन्नाट कल्पना सुचली, मग त्याच्या डोक्यात एक विचार चक्र सुरु झाले की आपण देवाला अर्पण केलेली ही फुले दुसऱ्या दिवशी कुठे जातात. मग त्याने पुजाऱ्यांना विचारले की ही शिळी फुले तुम्ही कुठे देता..तर त्यांनी सांगितले की पालिकेला..मग अनेक मंदिरात त्याने हाच प्रश्न केला तेव्हा आपण ज्यांना निर्माल्य म्हणतो ते देशातील बहुतेक मोठ्या मंदिरात कुठे खतासाठी वापरले जाते तर कुठे पालिकेचे कर्मचारी क्षेपणभूमीत घेऊन जातात. आता तुम्ही म्हणाल की निर्माल्यापासून करोडो कोणी कसे कमाऊ शकतो तर हीच सक्सेस स्टोरी आहे.
राजीव बंसल म्हणतात सुरूवातीला लोक मला कचरावाला समजायचे, आज माझ्यासोबत 80 लोक आहेत. आमचा टर्न ओव्हर वर्षाला 7 कोटी आहे. आता पुढे 15 कोटी रूपयांचा होईल असा अंदाज आहे. राजीव यांच्या प्लांटमध्ये पिठाच्या गिरणी सारखी मशिन सुरु असते त्यातून सुखविलेली फुलांची पावडर तयार केली जात असते. याच पावडर पासून पूजेसाठीचे सर्व साहित्य तयार केले जाते. त्यांना आकर्षक पॅकींग करून हे पूजेचे साहित्य बाजारात विकले जाते. निर्माल्य या ब्रॅंडचे को – फाऊंडर राजीव बंसल यांनी या प्रॉडक्टला बाजारात लोकप्रिय केले. पण हा प्रवास सोपा नव्हता.
लोकांनी श्रद्धेने अर्पण केलेली ही फुले नंतर कचरापेटीत जाण्यापेक्षा या फुलांच्या सुगंधाचा वापर करीत त्यापासून अगरबत्ती, धूप अगरबत्ती आणि बऱ्याच वस्तू तयार केल्या जातात. दिल्लीतील त्यांचा पिढीजात बिल्डरचा व्यवसाय सोडून त्यांनी फुले गोळा करायला सुरुवात केली तर घरचे बोलेले चांगला बिल्डरचा धंदा सोडून कुठे कचरा उचलायला चालला तेव्हा वाईटही वाटले. परंतू जसजसा धंद्यातून जम बसून पैसा मिळू लागला तसतसा मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागलो.
दिल्लीत राजेश यांनी त्यांच्या चौघा मित्रांसोबत 2019 निर्माल्य कंपनी स्थापन केली. त्याचे मित्र राकेश यांचा सुंगधाचा व्यवसाय आहे. त्यानंतर लखनऊच्या काऊन्सिलींग फॉर सायन्टीफीक एण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ( CSIR ) या संस्थेत त्यांनी निर्माल्यापासून अगरबत्ती आणि धूप बत्ती करण्याचे ट्रेनिंग घेतले. झेंडूची आणि गुलाबाची फुले सुकवून त्याची पल्पलायझर मिलमधून पावडर तयार केली जाते, त्यापासून या वस्तू तयार केल्या जातात. मंडोलीच्या साहिबाबाद परीसरात त्यांनी फॅक्टरी टाकली आहे. सुरभी आणि त्यांचे मिस्टर भरत बंसल या चार्टर्ड अकाऊंटेंट दाम्पत्यासोबत राजीव यांनी बॅंकेचे लोन काढून हा व्यवसाय उभा केला.