Ajit Isaac : प्रति चौरस फुटासाठी मोजले 70,300 रुपये; आहेत तरी कोण अजित इसाक?

| Updated on: Apr 20, 2024 | 10:11 AM

IT Hub बंगळुरुमध्ये एक मोठी प्रॉपर्टी डील नुकतीच झाली. अजित इसाक यांनी ही महागडी डील केली. प्रति चौरस फुटासाठी त्यांनी 70,300 रुपये मोजले. एकूण 10 हजार चौरस फूट जागेसाठी त्यांनी 67.5 कोटी रुपये दिले. ही आतापर्यंतची सर्वात महागडी डील ठरली आहे. कोण आहेत हे अजित इसाक?

Ajit Isaac : प्रति चौरस फुटासाठी मोजले 70,300 रुपये; आहेत तरी कोण अजित इसाक?
सर्वात महागडी मालमत्ता खरेदी
Image Credit source: संग्रहित छायाचित्र
Follow us on

Bangalore Most Expensive Property : आयटी सिटी बेंगळुरुमध्ये सर्वात महागडी प्रॉपर्टी डील झाली आहे. ही मालमत्ता जवळपास 10 हजार चौरस फुटावर पसरली आहे. त्यासाठी खरेदीदार अजित इसाक यांनी 67.5 कोटी रुपये मोजले आहेत. प्रति चौरस फुटासाठी इसाक यांनी 70,300 रुपये मोजले आहेत. बेंगळुरुतील कोरामंगलामधील बिलेनिअर रस्त्यावर ही मालमत्ता आहे. या खरेदीनंतर अजित इसाक आता देशातील दिग्गज व्यावसायिक फ्लिपकार्टचे सचिन बंसल (Sachin Bansal), इंन्फोसिसचे के नंदन नीलेकणि (Nandan Nilekani) आणि क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांचे शेजारी झाले आहेत.

कोण आहेत अजित इसाक?

अजित इसाक तंत्रज्ञाना क्षेत्रातील दिग्गज कंपनी क्वेस कॉर्पचे (Quess Corp) संस्थापक आणि चेअरमन आहेत. त्यांच्या कंपनीत जवळपास 5 लाख जण काम करतात. क्वेस कॉर्प ही 9 देशांमध्ये काम करते. Economic Times च्या वृत्तानुसार, या मालमत्तेने यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. यापूर्वी बेंगळुरु शहरात सर्वात महागडी मालमत्ता खरेदी 68 हजार रुपये प्रति चौरस फूट अशी झाली होती. अजित इसाक यांनी 70,300 रुपये प्रति चौरस फूट भावाने ही खरेदी केली आहे. यामुळे बेंगळुरुतील ही सर्वात महागडी प्रॉपर्टी डील ठरली आहे.

हे सुद्धा वाचा

2007 मध्ये केली होती क्वेस कॉर्पची स्थापना

अजित इसाक यांनी लोयला कॉलेज चेन्नई आणि युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी जवळपास 15 वर्षे गोदरेज आणि एस्सार सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये मानव संसाधन विभागात विविध पदांवर काम केले. 2007 साली त्यांनी क्वेस कॉर्पची स्थापना केली होती. फोर्ब्सनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये क्वेस कॉर्पची एकूण उलाढाल 9,758 कोटी रुपये इतकी होती. ही कंपनी तंत्रज्ञानाआधारे कर्मचारी आणि आऊटसोर्सिंग सेवा देते. ही कंपनी सेल्स, मार्केटिंग, टेलिकॉम आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट क्षेत्रात काम करते.

दोन वर्षांपूर्वी 105 कोटी केले दान

2022 मध्ये अजित इसाक यांनी 105 कोटी रुपये दान केले होते. ते सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने मदत करतात. त्यांनी 2022 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला जवळपास 105 कोटी रुपयांचे दान केले होते. ही रक्कम सेंटर फॉर पब्लिक हेल्थ अँड पॉलिसी रिसर्चसाठी खर्च करण्यात येणार होती. या महागड्या मालमत्ता खरेदीपूर्वी त्यांनी 2021 मध्ये कोरामंगलामध्ये जवळपास 52 कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता.