ITR | आयकर रिटर्न भरण्यात पुन्हा रेकॉर्ड, पुढे आले 8.18 कोटी करदाते

| Updated on: Jan 02, 2024 | 9:29 AM

ITR Filing | मोदी सरकारने कर संकलनासाठी अनेक प्रयत्न केले. करासंबंधी आणि कर भरण्याच्या प्रक्रियेतील किचकच प्रक्रिया दूर केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहे. गेल्या वर्षभरात करदात्यांची संख्या वाढली आहे. 2023 मध्ये रेकॉर्ड संख्येत आयटीआर दाखल करण्यात आले आहे. याचा अर्थ आहे तरी काय?

ITR | आयकर रिटर्न भरण्यात पुन्हा रेकॉर्ड, पुढे आले 8.18 कोटी करदाते
Follow us on

नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : देशातील करदात्यांनी यापूर्वीचे सर्व विक्रम इतिहासजमा केले. आयकर मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक आयटीआर रिटर्न दाखल करण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत रेकॉर्ड 8.18 कोटी इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यात आले. आयकर विभागाने याविषयीची आकडेवारी सादर केली. मोदी सरकारने आयकर वाढावा यासाठी अनेक बदल केले. करदात्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले. नवीन संकेतस्थळ आणण्यात आले. काही किचकट प्रक्रिया दूर करण्यात आली. पण अनुत्सूक करदात्यांना कराचा भरणा करण्यासाठी प्रवृत्त करण्यामागे अजून काय बरं कारणं असतील, तुम्हाला माहिती आहे का?

प्राप्तिकर विभाग लागला कामाला

आयकर विभागाने आर्थिक वर्षातील घडामोड टिपली. त्यांनी वर्ष 2023-24 मधील आकडेवारी समोर आणली. त्यानुसार आयटीआर फाईल करण्याच्या प्रकरणात 9 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. 31 डिसेंबर 2022 रोजीपर्यंत देशभरातून 7.51 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले. आयटीआरची संख्या वाढल्याने प्राप्तिकर विभागाला जादा काम करावे लागले. त्यांच्यावर यंदा कामाचा ताण वाढला.

हे सुद्धा वाचा

असे वाढले काम

वर्ष 2023 मध्ये प्राप्तिकर विभागाला 1.60 कोटी ऑडिट रिपोर्ट्स आणि इतर अर्जांच्या छाननीचे काम करावे लागले. गेल्या आर्थिक वर्षात 2022 मध्ये ही संख्या 1.43 कोटी इतकी होती. आयकर विभागाने करदात्यांना सोप्या स्वरुपातील वार्षिक माहिती पत्रक (AIS) आणि करदात्यांच्या माहितीचा घोषवारा (TIS) सुरु केला आहे. यामुळे करदात्याला त्याच्या वर्षभराच्या कराची माहिती सोप्या पद्धतीने समोर येत आहे.

मोदी सरकारचे प्रयत्न

मोदी सरकारने देशातील कर संकलन वाढीसाठी प्रयत्न केले. सरकारच्या याप्रयत्नामुळे आयकर रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्येत वाढ झाली आहे. अर्थात त्यात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. मोदी सरकारच्या काळात कर संकलनाविषयीचे आणि कर भरणा करणाविषयीच्या अनेक सुधारणा झाल्या आहेत. यामध्ये फेलसेल आयटीआर विवरण, सरकारची नवीन कर प्रणाली, नवीन कर प्रणालीतील सवलतींचा पाऊस, यामध्ये 7.5 लाख रुपयांची करदात्यांसाठीच सवलत, कर संकलनासाठी सातत्याने प्रचार, प्रसार, इंटरनेट आयुधांचा वापर, या सर्वांचा परिपाक कर संकलन वाढण्यात दिसून आला.

याचा अर्थ काय?

आयटीआरची संख्यात्मक वृद्धी आता गुणात्मक वृद्धीकडे झेपावत आहे. चालू आर्थिक वर्षासह पुढील वर्षात हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. कर भरणा करण्याकडे करदात्यांचा ओढा वाढत असल्याचे हे द्योतक आहे. संघटित क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध झाल्याचे हे संकेत आहेत. विशेष म्हणजे अर्थव्यवस्था वाढत असल्याच्या दाव्याला ही पुष्टी म्हणता येईल. तर कर संकलन वाढविण्यासाठीची जागरुकता उपयोगी पडल्याचे पण दिसून येते.