नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो. काही शेअर गुंतवणूकदारांना डिव्हिडंटचा (Dividend) लाभ देतात. या गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा होतो. त्यांना स्टॉकच्या वाढीचा फायदा तर मिळतोच, पण लाभांश रुपात ही लाभ मिळतो. अनेकदा गुंतवणूकदार डिव्हिडंडच्या फायद्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा या लाभांशाला फारस महत्व देत नाहीत. स्टॉकच्या चढउतारानुसार कमाईवर ते जास्त लक्ष देतात. पण काही कंपन्यांच्या डिव्हिडंडवर लक्ष दिले तर त्यांना मुदत ठेवीपेक्षा (Fixed Deposit) अधिकचा फायदा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे लाभांश पण कमाईचे मोठे साधन ठरु शकते, हे दिसून येते. त्यानुसार, बाजारातील सर्वाधिक लाभांश देणाऱ्या स्टॉकवर लक्ष केंद्रीत केल्यास तुम्हाला दुहेरी फायदा मिळू शकतो.
एचडीएफसी सिक्युरिटीजने अशाच काही स्टॉक्सची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांना फायदा होतो. या शेअरमध्ये त्यांना 3 ते 16 टक्क्यांपर्यंत लाभांश मिळतो. एचडीएफसी सिक्युरिटीने गुंतवणूकदारांसाठी पाच स्टॉकची यादी तयार केली आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला लांभाश मिळेल असा कंपनीचा दावा आहे.
टॉप 5 डिव्हिडेंड स्टॉक्स
एचडीएफसी सिक्योरिटीज नुसार, वेदांता शेअरचा डिव्हिडेंड 16 टक्के आहे. एनएमडीसीचा 12.9 टक्के आहे. आईओसी हा शेअर 10.6 टक्के, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचा शेअर 9.9 टक्के आणि आरईसीचा डिव्हिडेंड 9.4 टक्के मिळतो. डिव्हिडंड यील्डचा अर्थ कंपनी सध्या 100 रुपयांवर किती लाभांश देते.
पीटीसी इंडिया, नॅशनल ॲल्युमिनियम, कोल इंडिया, हडको, पीएफसी आणि इंडस टॉवर यांचा लाभांश 7 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या टॉप 50 डिव्हिडेंड स्टॉक्समध्ये 24 स्टॉकमध्ये 5 टक्क्यांहून अधिकचा लाभांश मिळतो. शेअर बाजारात अशा स्टॉक्सची कमी नाही, जिथे तुम्हाला लाभांशातून कमाई करता येणार नाही.
बाजारातील तज्ज्ञानुसार, जर तुम्हाला दीर्घकाळासाठी पोर्टफोलिओ तयार करायचा असेल तर त्यात काही लाभांश देणारे स्टॉक पण हवेत. लाभांश किती द्यायचा, कधी द्यायचा हे पूर्णतः त्या कंपनीच्या हातात असते. तसेच यापूर्वी इतका लाभांश दिला, तर पुढील वेळी किती लाभांश देण्यात येईल, हे ती कंपनी ठरवते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी सल्लागाराकडून लाभांश देणाऱ्या स्टॉकची यादी तयार करुन, त्यात गुंतवणूक करता येईल. त्यातून जोरदार फायदा मिळविता येईल.
हा कोणत्याही प्रकारचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी त्यांचा अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला याआधारे गुंतवणूक करावी. ही केवळ त्या स्टॉकच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणुकीपूर्वी सारासार विचार करावा.