नवी दिल्ली : लार्सन अँड टुब्रोचे ( L&T ) ए.एम.नाईक यांनी कंपनीला साठ वर्षे सेवा दिली. आपल्या सक्सेस फुल करीयरचे रहस्य हे आहे की दर तीन वर्षांनी आपण परिस्थितीनुरुप स्वस्तामध्ये बदल करायचो. त्यामुळे आपण या क्षेत्रात टीकू शकलो असे नाईक म्हणतात. त्यांनी कॉलेजमध्ये अनेक वेळा दांड्या मारल्या परंतू 21 वर्षे सुटी न घेता पंधरा तास काम केल्याचे त्यांनी इंग्रजी वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले. ज्युनिअर इंजिनिअर ते कंपनीचे चेअरमन पदापर्यंत झेप घेणारे नाईक सप्टेंबरमध्ये निवृत्त होत आहेत.
कॉलेजला मला आमचे प्रोफेसर नेहमी गैरहजेरीवरुन टोमणे मारायचे. मी विद्यार्थी असताना इतर कामातच व्यस्त असायचो तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी अभावाने लेक्टरला बसायचो. शिक्षक म्हणायचे एकाला दहावीत चांगले मार्क आहेत पण तो कॉलेजमध्ये काही चांगले गुण आणेल असे वाटत नाही असे आपल्याकडे पाहून शिक्षक बोलायचे असे नाईक सांगतात.
परंतू परिस्थिती बदलली आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर आपल्यात संपूर्ण बदल झाला. कॉलेज संपल्यावर स्टुडन्ट लाईफ संपले आणि कॉपोर्रेट लाईफ सुरु होत आहे. आणि कॉलेज बंक करणाऱ्याने 21 वर्षे सुटी न घेता काम केल्याचे नाईक म्हणाले. एल अँड टी कार्यालयात काम करताना पत्नी घरी एकटी असायची अनेकवेळा रात्री 12 वाजता माझी शेवटची बस चुकायची. मग मी कार्यालयात येऊन झोपायचो असे नाईक यांनी मनी कंट्रोलशी बोलताना सांगितले.
त्यानंतर मि. बेकर ज्यांनी मला नोकरीवर ठेवले होते त्यांनी मला दोन वर्षांनंतर स्कूटर दिली. मला कार लवकर मिळावी यासाठी त्यांना पुढाकार घेतला. अर्थात हे सर्व मी कंपनीसाठी जीव ओतून काम केल्याने शक्य झाले. मी जे केले त्याचा अभिमान आहे. मला असा प्लॅटफॉर्म तयार करायचा होता ज्या देशाला फायदा होईल असे नाईक यांनी स्पष्ट केले.
L&T च्या अनेक प्रगती आणि बदलांमागची प्रेरणादायीशक्ती असलेले नाईक 30 सप्टेंबर रोजी आपल्या पदावरून पायउतार होत आहेत, परंतु L&T च्या कामगारांच्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत राहतील. एक ज्युनिअर इंजिनियर ते कंपनीचे चेअरमन असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे.