नवी दिल्ली : ई-कॉमर्समधील (E-Commerce) मोठी कंपनी Amazon, पुढील आठवड्यात जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांची सुट्टी (Lay Off Employee) करणार आहे. वास्तविक हा आकडा कंपनीच्यादृष्टीने नगण्य आहे. एकूण कर्मचाऱ्यांपैकी कर्मचारी केवळ 1 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. पण या कपातीमागील एक कारण भविष्यातील बदलाची नांदी आहे. त्याचा मोठा परिणाम मनुष्यबळावर परिणाम करणारे ठरणार आहे.
तर या कपातीमागे एक प्रगत तंत्रज्ञान आहे. वास्तविक ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या कार्यालयात मनुष्यापेक्षा रोबोटिकच्या हातात महत्वाची कामे सोपविण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कामासाठी मनुष्यांवरची अवलंबित्व कमी होणार आहे.
Amazon काही दिवसांपासून रोबोटिक वापरावर कार्य करत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, आता निर्बंध हटल्याने मालाची विक्री वाढली आहे. कामाचा उरक लवकर होण्यासाठी मनुष्याऐवजी हे काम रोबोटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
Amazon ने त्यासाठी त्यांच्या कार्यस्थळी रोबोटिक सिस्टम इन्स्टॉल करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रोबोट प्रोडक्ट पॅकेजिंग आणि डिलिव्हरीचे काम करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्याचा परिणाम मात्र कर्मचारी कपातीवर झाला आहे.
Amazon मधील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात ठरली आहे. न्यूर्याक टाईम्सच्या अहवालानुसार, ही डिव्हाईस युनिटवर त्यांचे लक्ष्य केंद्रीत करणार आहे. यामध्ये व्हाईस असिस्टंट अलेक्साचा वापर करण्यात येणार आहे.
गेल्यावर्षी कंपनीकडे एकूण 1.6 दशलक्ष पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी होते. पण कंपनीने आता रोबोटच्या माध्यमातून काही विभागात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नवीन भरतीवर ब्रेक लावला आहे.
Amazon ने रोबोटकडून काम करुन घेण्यासंदर्भात अजब दावा केला आहे. त्यानुसार, रोबोटने काम केल्यास कंपनीच्या खर्चात मोठी बचत होईल. यासोबतच हे रोबोट कर्मचारी न थकता उत्पादनांचं वर्गीकरण, पॅकेजिंग आणि डिलिव्हरी अवघ्या काही तासात करुन मोकळे होतील.
सध्या Amazon डिलिव्हरीत जवळपास तीन चतुर्थांश पॅकेटचे वर्गीकरण आणि डिलिव्हरीचे कामं रोबोटचं करत आहेत. पण कंपनीवर एवढ्यावरच थांबली नाही, येत्या पाच वर्षांत कंपनीने हा विभाग 100 टक्के रोबोटद्वारे हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मनुष्यबळाची काहीच आवश्यकता राहणार नाही.
टेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कपात सुरु केल्याने जगभरात एकच खळबळ माजली आहे. यामध्ये Meta आणि Twitter यांचा अग्रक्रम लागतो. तर इतर टेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीत मागे राहिल्या नाहीत.